विदेशी शक्तींकडून अशांतता निर्माण करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न; अनुराग ठाकूर यांची डॉर्सी यांच्यावर टीका

विदेशी शक्तींकडून अशांतता निर्माण करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न; अनुराग ठाकूर यांची डॉर्सी यांच्यावर टीका

Anurag Thakur : 2021 मध्ये, भारत सरकारने तीन कृषी कायदे आणले होते, जे शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आले. हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाला विरोध केला. या आंदोलनादरम्यान अनेक पत्रकार आणि यूजर्सनी ट्विटरवर मोदी सरकारविरोधात पोस्ट टाकल्या. आता ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी या आंदोलनाबाबत एका मुलाखतीत मोठा दावा केला आहे. ट्विटरला (Twitter) भारताकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खाती ब्लॉक करण्याच्या अनेक विनंत्या आल्या होत्या. यासोबतच सरकारला विरोध करणारी खाती बंद करण्याची धमकीही सरकारने दिली होती, असा दावा डोर्सी यांनी केला. (Anurag Thakur said Jack Dorsey Allegations are lies)

डोर्सी यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही डोर्सीचा दावा फेटाळून लावला आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात पारदर्शक लोकशाही आहे. भारतात निवडणुका जवळ आल्या की, अनेक विदेशी शक्तींना आणि त्यांच्या एजंट यांना अचानक जाग येते. ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात एकप्रकारे अशांतता आणि असंतोष निर्माण करण्याचा नियोजनबध्द पद्धतीने प्रयत्न करत असतात, असं ठाकुर यांनी सांगितले.

ते म्हणाले, चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न या परकीय शक्तींकडून होत आहे. याआधीही अशा घटनांचा पर्दापाश झाला आहे. आणि आताही पर्दापाश होईल, असं म्हणत अनुराग ठाकूर यांनी डोर्सी यांचे आरोप फेटाळले आहेत.

एमके स्टॅलिन यांच्यासाठी शरद पवार मैदानात, भाजपच्या ‘त्या’ कृतीचा केला निषेध

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही डोर्सीं यांचे आरोप खोटे असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, जॅक डोर्सी हे उघडपणे खोटे बोलले. ट्विटरच्या इतिहासातील संभाव्य शंकास्पद भाग पुसून टाकण्याचा ते प्रयत्न करत आहे. डोर्सी आणि त्यांच्या टीमने सातत्याने भारतीय कायद्यांचे उल्लंघन केले. 2020 ते 2022 पर्यंत ट्विटरने भारतीय कायद्यांचे पालन केले नाही. डोर्सीच्या काळात ट्विटरला भारतीय कायद्याचे सार्वभौमत्व स्वीकारण्यात अडचण आली, त्यामुळं हे खोटे आरोप केले जात असल्याचं राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं.

डोर्सी यांचे आरोप काय?
जॅक डोर्सी यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात एका मुलाखतीत मोठा दावा केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारने ट्विटरला धमकावलं होतं, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच डोर्सी यांनी असाही दावा केला की, मोदी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांची ट्विटर खाती बंद करण्यासही ट्विटरला सांगण्यात आलं, तसे न केल्यास भारतात ट्विटर बंद करण्याची आणि कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्याची धमकी देण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube