पश्चिम बंगालमधील एक्झिट पोलमध्ये ट्वीस्ट; अॅक्सिस माय इंडियाने आकडा देणे का टाळले ?

Mamata Banerjee-आम्ही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुमारे 60 ते 70 टक्के लोकांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचा एक्सिस माय इंडियाची माहिती.

  • Written By: Published:
West Bangal Election My Axis India

Axis My India Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात विक्रमी मतदान झाल्यानंतर बुधवारी रात्री एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर केले आहेत. अनेक संस्थांनी बंगालमध्ये सत्तांतर होऊन भाजपचे (BJP) सरकार सत्तेत येईल, असा अंदाज वर्तविला आहे. तर काही मोजक्या संस्थांनी पुन्हा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तविला आहे. प्रसिद्ध सर्वेक्षण संस्था (Axis My India) यांनी पश्चिम बंगालसाठी एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार दिलाय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर लॉन्च, 15 मे ला होणार प्रदर्शित!

पुरेसा आणि प्रतिनिधिक नमुना (sample) मिळाला नसल्यामुळे आकडेवारी जाहीर करणे योग्य नसल्याचे संस्थेने स्पष्ट केलंय. अॅक्सिस माय इंडियाचे प्रदीप गुप्ता यांनी एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रदीप गुप्ता म्हणाले, Axis My India ची पद्धत म्हणजे मतदारांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे. मात्र पहिल्या टप्प्यानंतर जेव्हा आम्ही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुमारे 60 ते 70 टक्के लोकांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. निवडणुकांच्या संदर्भात मतदार शांत आहेत. ते काही बोलण्यास तयार नाहीत. आमच्याकडे फक्त 20-30 टक्के नमुना असल्यास त्यावर आधारित अंदाज जाहीर करणे योग्य नाही. त्यानंतर गुरुवारी दुपारी गुप्ता यांनी स्पष्ट केले की Axis My India पश्चिम बंगालसाठी एक्झिट पोल आकडेवारी जाहीर करणार नाही. राजकीय भाषेत हे सायलंट मतदार आहेत. त्यांच्यावर बरचंस राजकीय गणित अंवलबून असतं.


कोल्हेंना विधान परिषद…भाजपचा डाव…कोपरगावात समीकरण बदलणार

पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 जागा आवश्यक आहेत. काही संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज समोर आले आहेत. Praja Poll ने भाजपला 178 ते 208 जागा दिला आहे. तर Matrize आणि Poll Diary यांनी अनुक्रमे 161 आणि 171 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केलाय.


केवळ जनमतचा पोल टीएमसीच्या बाजूने

याउलट जनमत पोलने टीएमसी व सहयोगी पक्षांना 195 ते 205 जागा दाखविला आहे. तर तर Peoples Pulse ने 177 ते 187 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर बहुतेक एक्झिट पोलमध्ये कॅम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (Marxist) आणि काँग्रेसची कामगिरी कमकुवत आहे. या पक्षाला एखादी दुसरीच जागा मिळू शकतो.


कुणाचा एक्झिट पोल कसा ?

जनमत सर्वे-भाजप 80 -90, टीएमसी 195-205 जागा
प्रजा पोल: भाजप 178-208, टीएमसी 85-110 जागा
जेवीसी: भाजप 138-159, टीएमसी 131-152 जागा
पीपल पल्स: भाजप 95-110, टीएमसी 177-187 जागा
एनडीटीवी पोल ऑफ पोल्स: भाजप- 137, टीएमसी 151 जागा

follow us