शेख हसीनांच्या राजवटीचा अंत! कोण आहे नाहिद इस्लाम?, बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच चेहरा

शेख हसीनांच्या राजवटीचा अंत! कोण आहे नाहिद इस्लाम?, बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच चेहरा

Bangladesh violence : हजारो प्रदर्शनकर्त्यांनी बांगलादेशच्या राजधानी ढाकामध्ये शेख हसीना यांच्या सरकारी निवासस्थानी घुसून त्यांच्या वडिल मुजीबुर रहमान यांच्या प्रतिमेला हातोड्यांनी तोडलं आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यालयांना आग लावली. या प्रदर्शनकर्त्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याचा जल्लोष केला. (Bangladesh) शेख हसीना यांनी त्यांच्या सरकारविरुद्ध होत असलेल्या हिंसक प्रदर्शनांच्या दरम्यान राजीनामा दिला आणि देश सोडून गेल्या.

कोण आहेत लष्करप्रमुख जनरल वकार? शेख हसीना यांच्यानंतर स्वीकारणार बांगलादेशची जबाबदारी

आंदोलनाचा चेहरा

बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलनाने सुरुवात केलेल्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनापुढे अखेर हसीना सरकारला झुकावं लागलं. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रमुख नाव म्हणजे नाहिद इस्लाम. आरक्षणाच्या ज्वालामुखीमध्ये जळत असलेल्या बांगलादेशमध्ये नाहिद इस्लाम हे चेहरा बनले, ज्यांनी संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि शेख हसीना यांच्या सत्तेला उखडून फेकलं. या विद्यार्थी आंदोलनाचे 156 संयोजक आहेत. नाहिद इस्लाम यांनी 4 ऑगस्टपासून पूर्ण अहसयोग आंदोलनाची घोषणा केली होती, ज्यामध्ये शेख हसीना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.

चर्चेला नकार

नाहिद इस्लाम यांनीच आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनाच्या संयोजकांसोबत बोलणी करण्यासाठी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणाला नकार दिला होता. या दरम्यान नाहिद यांनी म्हटलं होतं की, देशात आणीबाणी किंवा कर्फ्यू, कोणताही बांगलादेशी स्वीकारणार नाही आणि आम्ही कोणतीही चर्चा करण्यास तयार नाही.

पोलिसांकडून अन्याय

नाहिद इस्लाम (32) हे ढाका विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील युवकांनी शेख हसीना सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात प्रदर्शन केले. या आंदोलनात 10 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. 19 जुलै 2024 च्या मध्यरात्री नाहिद इस्लाम यांना किमान 25 लोकांनी साबुजबाग येथून उचललं होतं. या वेळी त्यांचे डोळे बांधून त्यांना एका खोलीत नेलं. या दरम्यान नाहिद यांच्याकडून विद्यार्थी आंदोलनाबद्दल विचारपूस करण्यात आली आणि त्यांना त्रास देण्यात आला.

Video: बांगलादेशमध्ये हिसांचाराचं रौद्र रूप; आंदोलकांनी माजी कर्णधाराचं घर पेटवलं; व्हिडिओ व्हायरलं

आर्थिक धोरणांवर टीका

21 जुलै रोजी नाहिद पुरबाचैल्फमधील एका पुलाखाली बेशुद्ध आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळले. 26 जुलै रोजी त्यांना धानमंडीच्या गोनोशस्थया रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून पोलिसांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं. या वेळी पोलिसांनी नाहिद यांच्यावर आंदोलन थांबवण्यासाठी दबाव टाकला. बांगलादेशमध्ये शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी 2018 साली नाहिद इस्लाम यांनी एक ऑनलाइन अभियान चालवलं होतं. या अभियानाला एक लाखांहून अधिक लोकांनी समर्थन दिलं होतं. 2020 साली त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांविरुद्ध एक व्हिडिओ जारी केला, जो संपूर्ण देशात व्हायरल झाला होता.

सामान्य कुटुंबातील जन्म-

नाहिद इस्लाम यांचा जन्म एक सामान्य कुटुंबात झाला. विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांना राजकारणात रस निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणांची आणि कामाची टीका करण्यास सुरुवात केली. त्यांच्या विचारांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आणि ते एक युवा नेता म्हणून उभे राहिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube