बिहारमध्ये महागठबंधनचे पानिपत का झाले ? राहुल गांधी तेजस्वीला घेऊन बुडाले !
Bihar Election Result 2025: तर भाजप हा 90 हून अधिक जागा जिंकत सर्वात मोठा ठरला आहे. जेडीयूला 80 जागा मिळताना दिसत आहे
Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा (Bihar Election Result 2025) निवडणुकीत एनडीएने बहुमताने सरकार आणले. केवळ बहुमत नाही तर तब्बल दोनशेहून अधिक एनडीएला (NDA) मिळाल्या आहेत. तर भाजप हा 90 हून अधिक जागा जिंकत सर्वात मोठा ठरला आहे. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयू याला पक्षाला 80 जागा मिळताना दिसत आहे. एनडीएतील सहकारी पक्षांनी कमी जागा लढवूनही त्या जिंकून चमत्कार घडविला आहे. चिराग पासवान यांच्या एलजेपी पक्षाने ही चांगली कामगिरी केलीय. पण उलट महाविकास आघाडी म्हणा किंवा हिंदीतील महागठबंधन म्हणा, त्यांचे पुरते पानिपत झाले आहे. बिहारमध्ये काँग्रेसला जनाधार राहिलेला नाही. तर स्थानिक पक्ष असलेल्या लालू यादव, तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला खास काही करता आलेले नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi), तेजस्वी यादव व इतर नेत्यांनी निवडणूक आयोग, सरकारवर टीका केली. परंतु जनतेने विकासाच्या मुद्द्यावर एनडीएला मतदान केल्याचे स्थानिक राजकीय विश्वेषक सांगतात. (Bihar Election Result 2025 Rahul Gandhi Tejaswi Yadav mahagatbandan)
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितिश कुमार या जोडीवर विश्वास ठेवला. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा डबल इंजिन सरकार मोठ्या बहुमताने सत्तेवर येणार आहे. परंतु महागठबंधनला मतदारांना का नाकारले याचे विश्वेषण वेगवेगळ्या मुद्यांनी केले जात आहे.
‘सैयारा’ पुन्हा जिंकतोय मनं! फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये ठरला ‘पॉप्युलर चॉइस’
घराणेशाही, मतचोरीचा मुद्दा गाजला पण
येथील मतदारांना एक संदेश मात्र दिला आहे तो म्हणजे घराणेशाहीला स्वीकारला जाणार नाही. मतचोरी, निवडणुकीतील हेराफेरीचे आरोपांना मतदारांनी भीक घातले नाही. विकासाच्या मुद्द्याएेवजी नकारात्मक वातावरण तयार करून महागठबंधन आघाडीने स्वतःचे हात जाळून घेतले आहेत. जुने पक्ष तग धरू शकले नाहीत. तेथे नवीन पक्षांना लोकांनी स्वीकारले नाही. प्रशांत किशोर यांनी नवीन पक्ष स्थापन केला. त्यांनी वातावरण निर्मिती केली. पण लोकांनी त्यांना मतांचे दान दिले नाही. त्यामुळे नवीन पक्ष काढणे सोपे आहे. तो लोक स्वीकारत नाही हे या निवडणुकीतून दिसून येत आहे.
Video : बिहारमध्ये ‘फिर एकबार ‘NDA’ सरकार, गठबंधनचा सुपडासाफ, पंतप्रधान काय म्हणाले?
जनादेशावर एनडीएच्या नेत्यांनाही विश्वास नाही
बिहारमधील निकालामुळे देशभरातील लोक स्तब्ध झालेले आहे. मोठ-मोठ राजकीय पंडितही असा निकाल येईल, सांगू शकत नव्हते. तर एक्झिट पोलपेक्षा जास्त झाला एनडीएला मिळाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपला हे सर्वात मोठे यश आहे. बिहारमधील विकासाचे मुद्दे, महिलांसाठी कल्याणकारी योजनांचा एनडीएला भरघोस फायदा झालाय.
अमित शहांची निवडणूक रणनिती कामी आली
मोदींचा चेहरा, मोदींची हमी, नितीश यांच्याबद्दलची सदिच्छा आणि अमित शहांच्या निवडणूक रणनितीमुळे एनडीएला मोठे यश मिळाले आहे. जाहीरनाम्यात लोकांना हव्या असलेल्या विकासांच्या मुद्द्यांना हात घालण्यात आला होता. त्याचा रोडमॅप मांडण्यात आला होता. जागा वाटपापासून ते निवडणुकीचा प्रचारात एनडीएने मजबूत तयारी केली होती. एनडीएच्या घटकपक्ष एकजुटीने लढत होते. उलटचित्र महागठबंधनमध्ये होते. जागा वाटपापासून ते प्रचारात विस्कळीतपणा होता. काही ठिकाणी तर आरजेडी आणि काँग्रेसमध्ये लढती झाल्या. त्याचा फटकाही महागठबंधन आघाडीला बसला आहे.
राहुल गांधी विकासाचा मुद्दा विसरले, मोदींवरील टीका नडली ?
महागठबंधन हे लोकांना विकासाच्या मुद्द्यावर आपल्याकडे वळवू शकले नाहीत. तेजस्वी यादव यांनी प्रत्येक घरात एकाला सरकारी नोकरी दिली जाईल, असे जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात मतदारांना हा मुद्दाही भावला नाही. राहुल गांधींनी मोदी, भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ असे मुद्दे प्रचारात आणले. परंतु त्याचा काही फायदा झालेला नाही. उलट भाजपने तेजस्वी यादवांच्या आरजेडीला कट्टा सरकार म्हणून संबोधले आणि जुन्या काळातील गुन्हेगारीची आठवण मतदारांना आणून दिली.
