चीनला पाठवले जात असलेले 1680 किलो मानवी केस जप्त; नेपाळ बॉर्डवर मोठी कारवाई
Bihar News : मानवी तस्करी, दारू तस्करीच्या बातम्या आपण रोजच ऐकत असतो. परंतु, आता हाती आलेली बातमी थोडी वेगळी आहे. कारण ती आपल्याशीच निगडीत आहे. म्हणजेच माणसांचे केस तस्करीच्या माध्यमातून चीनला नेले जात असताना पकडण्यात आले. केंद्र सरकारच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने (DRI) ही कारवाई केली आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली असून मानवी केसांच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दक्षिण भारतातील तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांकडून केस अर्पण केले जातात. तशी प्रथा आहे. त्यामुळे या मंदिरासह दक्षिण भारतातील अन्य मंदिरातून केसांची चोरी करुन हे केस बिहार मार्गे घेऊन जात असताना पकडण्यात आले. हेच केस पुढे नेपाळमार्गे चीनला पाठवण्यात येणार होते. या कारवाईत पश्चिम बंगालमधील दोन तस्करांसह बिहारमधील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. टीआरआयचे पथक या लोकांची कसून चौकशी करत आहे.
महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा भयंकर पण मुख्यमंत्री फडणवीस..संजय राऊतांची घणाघाती टीका
बिहार-नेपाळ बॉर्डरजवळ मधुबनी जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले दोन तस्कर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील रहिवासी आहेत. तर बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातून एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर या माहितीची खात्री करून ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, पश्चिम बंगालची पासिंग असलेला एक ट्रक मधुबनी येथून चाललेला होता. या ट्रकमधून मानवी केस घेऊन जात असल्याची माहिती पथकाला मिळाली.
ट्रक ताब्यात घेण्यात आला. याबाबत अधिक चौकशी केली असता दक्षिण भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांहून केसांची चोरी करण्यात आल्याची माहिती मिळाली. तिरुपती बालाजी मंदीर परिसरातून सर्वाधिक केस गोळा करण्यात आले होते. या केसांची किंमत 80 लाख आहे असून एकूण 1680 किलो केस असल्याची माहिती देण्यात आली. नेपाळ मार्गे हे केस चीनला पाठवले जाणार होते. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पकडण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी केली जात आहे.
बिहार बनतंय तस्करीचा मार्ग
डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की भारतात केसांचा पुरवठा करण्यास बंदी आहे. त्यामुळे काही टोळ्या मानवी केस नेपाळमार्गे चीनला पाठवतात. या केसांच्या माध्यमातून विग आणि अन्य वस्तू तयार केल्या जातात. चीनमध्ये या वस्तूंना जास्त मागणी आहे. तसेच जगभरात या वस्तूंची निर्यात केली जाते. याआधी या प्रकरणात ईडीची कारवाई आणि बॉर्डर सील झाल्यामुळे या टोळ्यांतील लोक पश्चिम बंगालऐवजी बिहारमधील रस्त्यांचा वापर करत आहेत.
बिहारी राजकारणात ट्विस्ट! नितीशकुमारांच्या जुन्या सहकाऱ्याचा पक्ष लाँच; १४० जागा रडारवर..