Biparjoy Cyclone : गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, हजारो नागरिकांचं स्थलांतर…
Biparjoy Cyclone
बिपरजॉय चक्रीवादळ जसं जसं गुजरातकडे सरकतंय तसं-तसा पाऊस जोर धरत असल्याचं दिसून येत आहे. गुजरातमध्ये पावसाची तुफान बॅटींगला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवण्यात आलं आहे.
अरबी समुद्रात घोंगावत असलेलं बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं असून ते हळूहळू गुजरातकडे सरकतंय. हे वादळ भीषण रुप धारण करत असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आल्यानंतर गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Neha Malik: ‘कपड्यात मजा नाही, आता नेहाने केली नवी आयडिया, नेटकरी गेले कोमात!
दरम्यान, उद्या 15 जून रोजी बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गुजरात सरकारही सतर्क झाले असून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काल आढावा घेतली. या बैठकीनंतर नव्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं असून चक्रीवादळामुळे होणारं नूकसान कमी करण्याचा आमचा उद्देश असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही नागरिकांना काळजी घेऊन सूचनांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे.