टोमॅटो महाग असतील तर खाणं सोडून द्या; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला

टोमॅटो महाग असतील तर खाणं सोडून द्या; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला

Pratibha Shukla on Tomato prices : सध्या देशभरात टोमॅटोचे भाव (Tomato prices) गगनाला भिडले. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींबाबत सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण संताप व्यक्त करत आहेत. टोमॅटोसाठी एवढे पैसे मोजणं शक्य होत नसल्यानं हे भाव लवकरात लवकर पूर्ववत व्हावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर योगी सरकारमधील मंत्री आणि उत्तर प्रदेशातील भाजप नेत्या प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी अजब विधान केलं. टोमॅटो महाग वाटत असतील त खाणं बंद करा, असं विधान त्यांनी केलं. ( BJP minister Pratibha Shukla on Tomato prices Avoid eating tomatoes if they are expensive)

सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या दरवाढीवर तुमची प्रतिक्रिया काय आहे? तुम्ही लोकांना काय सांगाल? महिला असल्याने तुम्ही या विषयाकडे कसे पाहता, असा प्रश्न विचारताच प्रतिभा शुक्ला म्हणाल्या, सगळ्यात आधी तर मी लोकांना सांगेल की, तुम्ही आपल्या घरातट कुंडीत टोमॅटो लावा. काय प्रोब्लेम आहे? असं टोमॅटो लावायला. आणि टोमॅटो फार महाग वाटत असतील तर ते खाणं सोडून द्या. तुम्ही खाणं बंद केलं की, आपोपाप टोमॅटो होतील.

‘डिस्को डान्सर’चे निर्माते बी सुभाष यांच्यावर दु:खाचा डोंगर! मुलीचे निधन 

मंत्री शुक्ला पुढे म्हणाले, आमच्याकडे एका गावात पोषण बाग विकसित केली आहे. त्या गावातील सर्व महिला गावातील एका परिसरात कचरा एकत्र करतात. या महिलांनी तेथे भाजीपाल्याचे उत्पादन घेतलं. त्यामुळं आता त्यांना भाजी घेण्यासाठी बाजारात जावे लागत नाही. त्या पोषण बागेत टोमॅटोचंही उत्पादन घेतात. तसंच इतरांनीही करावं, असं शुक्ला म्हणाल्या.

दरम्यान, महागाई ही काही नवीन गोष्ट नाही. आणि टोमॅटो महाग होणं हे तर नक्कीच नवीन नाही. दरवर्षी या काळात टोमॅटो हा महाग होतो, असे टोमॅटोच्या दरवाढीवर टीका करणाऱ्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले.

शुक्ला यांच्या वक्तव्याचा काँग्रेसनेही खरपूस समाचार घेतला आहे. यूपी काँग्रेसने शुक्ला यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, ‘बाबांच्या सरकारच्या मंत्री प्रतिभा शुक्ला म्हणत आहेत, ज्या वस्तू महाग आहेत. त्यांना खाऊ नका, ’ म्हणजे सरकारचा आदेश आला आहे की, ‘उपाशी मरायचे असेल तर मरा! पण महागाईशी तडजोड करता येत नाही, असं कॅप्शन कॉंग्रसेनं लिहिलं.

दरम्यान, टोमॅटो महाग असतील तर खाणं सोडून द्या, प्रतिभा शुक्ला यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर टीका केली आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही असं बोलणं शोभत नाही. जबाबदारीनं वक्तव्य करा, असं नेटकरी म्हणत आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube