Paris Olympics 2024 : कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं बाजी मारली! स्वप्नील कुसळेची कांस्य पदकाला गवसणी
Paris Olympics 2024 : आणखी एका भारतीय नेमबाजाने ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवला आहे. नेमबाज स्वप्नील कुसळे याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नील कुसळेचा हा विजय ऐतिहासिक आहे कारण या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. कोल्हापूरच्या या २९ वर्षीय नेमबाजाचे हे पहिलेच ऑलिम्पिक (Paris Olympics ) आहे. या खेळाडूने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. हा खेळाडू 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न करत होता आणि पॅरिसमध्ये त्याला संधी मिळाल्यावर त्याने इतिहास रचला.
Paris Olympics : मनू भाकरने रचला इतिहास! सरबज्योतसह जिंकलं दुसरं कांस्यपदक
कुसळे याने एकूण 451.4 गुणांसह लक्ष्य पूर्ण केले आणि त्याला वाय.के.ला मागे टाकले. लिऊ आणि सेरहिय कुलिश अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले. कुसळेची कामगिरी लिऊच्या 463.6 आणि कुलिशच्या 461.3 च्या तुलनेत काहीशी कमी होती. शेवटच्या क्षणापर्यंत तो रौप्यपदकासाठी स्पर्धेत होता पण शेवटी त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागलं.
स्थिती सुधारली
स्वप्नील कुसळेने डावाची संथ सुरुवात केली. त्याने १५३.३ (पहिली सीरीज- ५०.८, दुसरी सीरीज– ५०.९, तिसरी सीरीज- ५१.६) स्कोअर केला. तो सहाव्या क्रमांकावर राहिला. यानंतर, त्याने प्रोनमध्ये (पहिली सीरीज- ५२.७, दुसरी सीरीज- ५२.३, तिसरी सीरीज- ५१.९) १५६.८ गुण मिळवून आपली स्थिती सुधारली. प्रोननंतर तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. येथून त्याला चमत्कार करण्याची गरज होती.
पॅरिसमध्ये शेतकऱ्याच्या पोरनं फडकावला तिरंगा; जाणून घ्या, कोण आहे कांस्य जिंकणारा सरबज्योत सिंग
मोठ आव्हान
क्रमवारीत, स्वप्नील कुसळेने पहिल्या सीरीजमध्ये ५१.१ आणि दुसऱ्या सीरीजमध्ये ५०.४ म्हणजेच एकूण १०१.५ गुण मिळवले. म्हणजेच त्याचा एकूण स्कोअर ४२२.१ होता आणि तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला. इथून पुढे आव्हान आणखी गंभीर होते. पण इथून पुढे स्वप्नील कुसळेने मागे वळून पाहिले नाही. एलिमिनेशनमध्ये त्याने शानदार पद्धतीने कांस्यपदक पटकावलं.
🇮🇳🥉 𝗕𝗥𝗢𝗡𝗭𝗘 𝗡𝗢. 𝟯 𝗙𝗢𝗥 𝗜𝗡𝗗𝗜𝗔! Many congratulations to Swapnil Kusale on winning India's third medal at the Paris 2024 Olympics!
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗶𝘀… pic.twitter.com/eokW7g6zAE
— Sportwalk Media (@sportwalkmedia) August 1, 2024