मोठी बातमी! तुहीन कांत पांडे नवे SEBI चीफ; माधवी पुरी बुच यांना निरोप

मोठी बातमी! तुहीन कांत पांडे नवे SEBI चीफ; माधवी पुरी बुच यांना निरोप

Tuhin Kant Pandey New SEBI Chief : वित्त सचिव तुहिन पांडे आता नवीन (Tuhin Kant Pandey) सेबी प्रमुख असतील. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने गुरुवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. पांडे पुढील तीन वर्षे सेबी चीफ म्हणून काम पाहतील. सध्याच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या जागी पांडे यांची नियु्क्ती करण्यात आली आहे. बुच यांचा कार्यकाळी आज संपणार आहे. पांडे यांना अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने एक आदेश जारी केला आहे. यामध्ये म्हटले आहे की नियुक्ती समितीने आयएएस वित्त सचिव आणि महसूल विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांची सेबीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. पारदर्शक प्रक्रियेनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज सादर करण्यासाठी 17 फेब्रुवारी अंतिम मुदत होती. अर्थ मंत्रालयाने वर्तमानपत्रांत जाहिराती देखील दिल्या होत्या. या जाहिरातींच्या माध्यमातून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते.

सेबी प्रमुखांचा पगार किती ?

सेबी चीफ एक महत्वाचे पद आहे. देशातील शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्याचे काम अध्यक्षांमार्फत केले जाते. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याचीही जबाबदारी सेबी प्रमुखांची आहे. सेबी प्रमुखांना केंद्र सरकारच्या सचिवांच्या बरोबरीने पगार मिळतो. हा पगार घर आणि चारचाकी वाहनाशिवाय 5 लाख 62 हजार 500 रुपये प्रति महिना आहे. पांडे यांना वित्तीय प्रकरणांचा सखोल अभ्यास आहे. त्यांचा अनुभव जास्त आहे. त्यामुळे सेबी प्रमुख म्हणून त्यांच्या नियुक्तीने बाजारात स्थिरता येईल असे सांगण्यात येत आहे.

सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांना लोकलेखा समितीचे समन्स; चौकशी होणार?

कोण आहेत तुहीन पांडे

मोदी सरकारमध्ये तुहीन पांडे यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. पांडे डीआयपीएएम विभागाचे सचिव राहिले आहेत. यानंतर त्यांना अर्थ मंत्रालयाचे सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. विवेक जोशी त्यांच्या गृहराज्यात गेल्यानंतर पांडे यांना डीओपीटी (कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग) सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

ओडिशाचे असलेले पांडे डीआयपीएएम विभागाचे सचिव म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात या विभागाला विनिवेश विभाग म्हणूनही ओळखले जात होते. एअर इंडिया, निलांचल इस्पातचे खासगीकरण आणि एलआयसीचा आयपीओ आणण्यात पांडे यांची महत्वाची भूमिका होती. याच काळात टाटा समुहाला एअर इंडियाची विक्री करण्यात पांडे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ही सरकारी कंपनी दीर्घकाळापासून तोट्यात होती.

बर्मिंघम विद्यापीठातून एमबीए

पांडे यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि इंग्रजीमध्ये मास्टर डिग्री मिळवली. यानंतर त्यांनी बर्मिंघम विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. सेबीच्या अध्यक्षाच्या रुपात त्यांची नियुक्ती झाल्यानंतर शेअर बाजारात अनेक बदल होतील. त्यांचा अनुभव आणि विशेषज्ञतेचे सेबीला निश्चितच फायदा होईल असा विश्वास सरकारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला.

अनिल अंबानींच्या मुलावर सेबीची मोठी कारवाई; ठोठावला एक कोटी रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube