Video : लोकसभेत प्रचंड गदारोळ! विरोधी खासदारांनी ‘त्या’ विधेयकाची प्रत फाडून शाहांकडे फेकली

Video : लोकसभेत प्रचंड गदारोळ! विरोधी खासदारांनी ‘त्या’ विधेयकाची प्रत फाडून शाहांकडे फेकली

Chaos in Parliament : आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तीन अत्यंत महत्वाची विधेयके सादर केली. यात गंभीर गुन्ह्याच्या आरोपात 30 दिवस तुरुंगात राहिल्यास संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून हटवण्याची तरतूद आहे. दरम्यान, या विधेयकावरून आज (Chaos in Parliament) लोकसभेत प्रचंड गदारोळ (Lok Sabha) झाला. इतकेच नाही तर विरोधी पक्षांतील खासदारांनी विधेयक फाडून थेट अमित शाहांच्या दिशेने फेकला. शाह यांनी तिन्ही विधेयके वेगवेगळी सादर केली. कारण यात केंद्र, राज्य आणि केंद्रशासित राज्यांच्या नेत्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी आहेत.

शाह यांनी विधेयक सादर करताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या दरम्यान काही खासदारांनी विधेयकांच्या प्रती फाडून अमित शाह यांच्या दिशेने फेकल्या. विरोधकांच्या या प्रकारामुळे लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला. सत्ताधारी पक्षांच्या खासदारांनीही विरोधकांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली.

माईक मोडण्याचाही विरोधकांचा प्रयत्न

अमित शाह म्हणाले, या विधेयकांना संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव सरकार मांडत आहे. यानंतरही विरोधकांचा गोंधळ कमी झाला नाही. त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरूच होती. या दरम्यान सभागृहात तणाव निर्माण झाला होता. काही खासदारांनी गृहमंत्र्यांचा माईक मोडण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षांतील रवनीत बिट्टू, कमलेश पासवान, किरेन रिजीजू आणि सतीश गौतम या खासदारांनी गृहमंत्र्यांचा बचाव केला आणि विरोधी खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला.

तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सर्वात आधी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी विधेयक सादर होताच घोषणा देण्यास सुरुवात केली. काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी आपल्या जागेवर उभे राहून विधेयकाची प्रत फाडून फेकून दिली. नंतर काँग्रेसचे खासदार मोकळ्या जागेत आले. समाजवादी पार्टीचे खासदारांनीही विधेयकाच्या प्रती फाडल्या. या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

तुम्ही मला नैतिकता शिकवणार का?, PM, CM हटवण्याच्या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी सुनावलं

केसी वेणुगोपाल यांच्यावर शाहा बरसले

या गोंधळातच अमित शाह बोलत होते. परिस्थिती अधिक चिघळत असल्याचे लक्षात येताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. अमित शाह यांनी केसी वेणुगोपाल यांच्यावर जोरदार टीका केली. ज्यावेळी ते खोट्या प्रकरणात तुरुंगात गेले होते त्यावेळी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. जोपर्यंत न्यायालयाने त्यांना निर्दोष सिद्ध केले नाही तोपर्यंत कोणतेच संवैधानिक पद घेतले नव्हते. आम्ही इतकेही निर्लज्ज नाही की आरोप झाल्यानंतरही त्या पदावर कायम राहू. राजकारणात नैतिकता आणि शुचिता आवश्यक आहे आणि हाच हेतू या विधेयकाचा आहे.

विधेयक जेपीसीकडे पाठवण्याचा प्रस्ताव

अमित शाहा यांनी विधेयक सादर करतानाच सांगितले की सरकार या विधेयकांना संयुक्त संसदीय समितीकडे (Joint Parliament Committee) पाठवण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. त्यांच्याकडून सातत्याने गोंधळ घातला जात होता. या दरम्यान सभागृहात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या गोंधळातच काही काळ सभागृहाचे कामकाज सुरू राहिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube