आश्वासन दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागं घ्या, अन्यथा… सीजेपीकडून सरकारला पुन्हा मोठा इशारा
सीजेपीच्या इशाऱ्यानंतर तात्काळ सरकारने आंदोलकांवरील एफआयआर वापस घेतले जातील आणि कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा एकदा सरकारला (CJP) मोठा इशारा दिला. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपले आहे. मात्र, आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यांना अटक केली जात आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास याने मोठं भाष्य केलं आहे. वेगवेगळ्या राज्यातून आंदोलकांना ताब्यात घेणं, त्यांना अटक करणं याबाबत माहिती पुढं येत आहे.
जर उद्यापर्यंत सर्व एफआयआर वापस घेतले नाही तर पुढं काय करायचे याचा विचार केला जाईल. सीजेपीने दावा केला की, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये एसन्सीकडून आंदोलकांना टार्गेट केलं जात असल्याची माहिती आहे. सीजेपीच्या इशाऱ्यानंतर तात्काळ सरकारने आंदोलकांवरील एफआयआर वापस घेतले जातील आणि कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं म्हटलं. मात्र, येणारे रिपोर्ट नक्कीच चिंताजनक होते.
थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी, बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळलं
कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी आक्रमक भूमिका घेताना दिसले. एक एक करून देशभरातील सर्व शहरांपर्यंत आंदोलन पोहोचले. विद्यार्थी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू असताना याच मुद्द्यात राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलनासाठी बसले. त्यानंतर वातावरण अधिकच चिघळताना दिसले. 20 जुलै रोजी मोठा मोर्चा संसदेवर निघाला.
हा मोर्चा संसद परिसरात पोहोचला. त्यानंतर थेट मोठा हिंसाचार झाला. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यावेळी काही विद्यार्थ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलनात थेट AK-47 ने गोळीबार करणाऱ्या एसपी पुरण झा यांचा अंगरक्षक अभिषेक पटेलला निलंबित करण्यात आलं आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर उद्या (28 जुलै) सुनावणी होणार आहे.