मुख्यमंत्री भगवंत मान शीख धर्मविरोधी, संबंध तोडण्याचे निर्देश; ‘त्या’ प्रकरणात अकाल तख्तचा मोठा निर्णय

Bhagwant Mann :  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना मोठा धक्का देत अकाल तख्तने दोषी ठरवले आहे. धार्मिक गैरवर्तन आणि पंथच्या हिताच्या विरोधात

Bhagwant Mann

Bhagwant Mann :  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना मोठा धक्का देत अकाल तख्तने दोषी ठरवले आहे. धार्मिक गैरवर्तन आणि पंथच्या हिताच्या विरोधात कृत्य केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मान यांनी शीख धर्माच्या भावना धुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरच सुनावणी करत शीख धर्मातील सर्वोच्च आणि सर्वात प्रभावाशाली धार्मिक संस्था असलेल्या अखाल तख्त निर्णय घेत मान यांना दोषी ठरवले आहे. याबाबत अकाल तख्तचे कार्यवाहक जत्थेदार ज्ञानी कुलदीप सिंग गडगज यांनी माहिती दिली आहे.

कुलदीप सिंग गडगज (Kuldeep Singh Gadgaj) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाद्वारे संपूर्ण शीख समुदायाला मुख्यमंत्री मान (Bhagwant Mann) यांच्याशी संबंध तोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विविध शीख संघटनांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कुलदीप सिंग गडगज यांनी दिली.  तर दुसरीकडे ‘जगत ज्योत श्री गुरु ग्रंथ साहिब सत्कार (सुधारणा) विधेयक 2026’ मधील काही तरतुदींबाबतही भगवंत मान यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. पवित्र धर्मग्रंथाच्या विटंबनेशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे. अकाल तख्तने विटंबनेबाबतच्या सरकारी कायद्याला दोषपूर्ण मानले असून, विविध शीख संघटना आणि धार्मिक संस्थांनीही त्याला विरोध दर्शविला आहे.

व्हिडिओ बनावट , सीएम मान यांचा दावा

तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एआयने तयार करण्यात आला असल्याचा दावा करत मुख्यमंत्री मान यांनी आरोप फेटाळून लावले आहे.  जत्थेदार ज्ञानी कुलदीप सिंग गडगज म्हणाले, आम्ही मुख्यमंत्र्यांना या व्हिडिओबाबत विचारणा केली होती आणि त्यांनी तो ‘एआय’चा वापर करून संपादित केल्याचा दावा केला होता. आम्ही त्यांना या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावा सादर करण्यास सांगितले होते, परंतु सहा महिने उलटूनही अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आम्ही भारत सरकारमान्य दोन फॉरेन्सिक प्रयोगशाळांकडून या व्हिडिओची सत्यता तपासली त्यातून असे निष्पन्न झाले की हा व्हिडिओ बनावटही नाही आणि ‘एआय’द्वारे तयार केलेलाही नाही.

खासदार वाकचौरे यांच्या दोन वर्षाच्या कारकीर्दीचा फुसका बार…-

आमदार आणि मंत्र्यांना 29 जून रोजी हजर राहण्याचे आदेश

‘जगत ज्योत श्री गुरु ग्रंथ साहिब सत्कार (सुधारणा) विधेयक 2026’ बाबतच्या विरोधामुळे, पंजाब सरकारचे ज्या आमदार आणि मंत्र्यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली होती, त्यांना 29 जून रोजी अकाल तख्तसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अकाल तख्तने यापूर्वीच विधेयकातील काही आक्षेपार्ह तरतुदी काढून टाकण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. अकाल तख्तच्या या घोषणेमुळे पंजाबच्या राजकारणात एक नवीन वळण आले आहे.

follow us