100 हून अधिक पेटंट अन् देशात टिव्ही, मोबाईल आणणाऱ्या पित्रोदांमुळे काँग्रेस अडचणीत
Congress in trouble due to Sam Pitroda Statement : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे ( Lok Sabha Election ) वारे वाहत आहेत याच दरम्यान काँग्रेस ( Congress ) नेते सॅम पित्रोदा ( Sam Pitroda ) यांच्या एका वक्तव्यावरून भाजपच्या हाती आयत कोलीत लागलं आहे. तर त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये ज्या सॅम पित्रोदांनी देशात टीव्ही, मोबाईल आणले. ज्यांच्या नावे 100 हून अधिक पेटंट आहेत. त्यांच्याचमुळे काँग्रेस अडचणीत सापडलं आहे.
काय आहे हे नेमकं प्रकरण?
नुकतीच काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी वृत्तसंस्था एएनआयशी अमेरिकेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी अमेरिकन उत्तराधिकारी कराबाबत एक विधान केलं. पित्रोदा म्हणाले की, अमेरिकेमध्ये उत्तराधिकारी कराची व्यवस्था आहे. ज्यामुळे एखाद्याकडे कोट्यावधीची संपत्ती असल्यास त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना केवळ 45% संपत्ती मिळते आणि उर्वरित 55% सरकारकडे जमा होते.
Simple Aahe Na : ‘रिश्ता हो या ना हो मुंबईचा…’ सिम्पल आहे ना? सीरिजचा मजेशीर ट्रेलर रिलीज
हा कायदा अत्यंत चांगला आहे. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची कोट्यावधींची संपत्ती ही केवळ त्यांच्या मुलांनाच नाही. तर जनतेला देखील मिळते. मात्र भारतात असं नाही. पालकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनाच ती संपत्ती मिळते. जनतेला ती मिळत नाही. त्यामुळे यावर चर्चा व्हायला हवी. कारण ही करव्यवस्था फक्त श्रीमंतांच्या नाही तर जनतेच्या हिताची आहे.
यंदाचा कान्स फेस्टिवल असणार खास; रेड कार्पेटवर अवतरणार Manushi Chhillar
तर पित्रोदांच्या याच विधानावरून भाजपने कॉंग्रेसला घेरले आहे. भाजपने म्हटले की, काँग्रेसने भारताला उध्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय. पित्रोदा हे 50% उत्तर अधिकारी करव्यवस्थेचे समर्थन करत आहेत. याचा अर्थ काँग्रेसचे सरकार आल्यास लोकांच्या मेहनतीची 50% संपत्ती हिसकावून घेतली जाईल. असं म्हणत भाजपकडून कॉंग्रेसर निशाणा साधण्यात आला आहे.
तर पित्रोदा यांच्या विधानावरून भाजपने टीका केल्यानंतर कॉंग्रेसकडून आणि स्वतः पित्रोदा यांच्याकडून देखील त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कॉंग्रेसने म्हटलं की, सॅम पित्रोदा यांनी देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. तसेच ते त्यांचे विचार स्वतंत्रपणे मांडतात. लोकशाहीमध्ये तो हक्क सर्वांना आहे. याचा अर्थ असा नाही की, ते विचार काँग्रेस पक्षाचे आहेत. मात्र भाजपकडून त्यांच्या लोकांची दिशाभूल करणाऱ्या प्रचारावरून लक्ष हटवण्यासाठी अशाप्रकारे विरोधकांच्या वक्तव्यांचा गैरवापर केला जात आहे. तसेच पित्रोदा यांनी देखील म्हटलं की, भाजपच्या खोट्या प्रचारावरून लक्ष विकेंद्रीत करण्यासाठी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे.