Adarsh Scam: अशोक चव्हाण भाजपचे ‘आदर्श’ नेते, काँग्रेस नेत्याने राज्यसभेत चव्हाणांना डिवचलं

Adarsh Scam: अशोक चव्हाण भाजपचे ‘आदर्श’ नेते, काँग्रेस नेत्याने राज्यसभेत चव्हाणांना डिवचलं

Ashok Chavan : भाजपचे नेते व खासदार अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित मुंबईतील (Adarsh Scam) आदर्श गैरव्यवहाराचा पुन्हा एकदा राज्यसभेत उल्लेख झाला. खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं भाषण संपल्यानंतर काँग्रेसचे खासदार (Pramod Tiwari) प्रमोद तिवारी यांनी अशोक चव्हाण यांचा ‘भाजपचे आदर्श नेते’ असा उल्लेख करीत ते भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मधून बाहेर पडल्याची टिप्पणी केली.

नांदेडमध्ये भाजपचा पराभव पाणी, नाणी, वाणी नासू नये; तुकोबारायांचा अभंग अन् जयंत पाटलांची दादा, शिंदेंवर फटकेबाजी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणावर मांडण्यात आलेल्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतला. मात्र, यावेळी ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला आहे, असं सांगितलं.

भाजपसाठी आदर्श नेते

यावर उत्तर देताना खासदार चव्हाण यांनी २०१४ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यात नांदेडच्या जागेचा समावेश होता, असा उल्लेख केला. या विजयात माझा काहीसा वाटा होता, असंही त्यांनी सांगितलं. अशोक चव्हाण यांच्या भाषणानंतर काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी आदर्श गैरव्यवहारात सामील असलेले अशोक चव्हाण भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छपणे बाहेर पडले, असा उल्लेख केला. चव्हाण आता भाजपसाठी आदर्श नेते आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

श्वेतपत्रिकेत उल्लेख माऊलींच्या पालखीचे भक्तांना मंत्रमुग्ध करणारे दिवेघाटातील विहंगम दृश्ये, पाहा फोटो

मोदी सरकारने मागील कार्यकाळाच्या शेवटी काँग्रेसच्या कारकिर्दीवर श्वेतपत्रिका काढली होती. त्यामध्ये अशोक चव्हाणांचे नाव असलेल्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला होता. तसंच, या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या समोरील अडचणी संपल्या नसल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, पुढील चारच दिवसांत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आणि ते भाजपमध्ये दाखलं झाले. मात्र, ‘आदर्श’ प्रकरणाचा वारंवार उल्लेख होतच आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज