जय-पराजय होतच असतो, स्मृती इराणींना अपशब्द बोलू नका…; राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला

जय-पराजय होतच असतो, स्मृती इराणींना अपशब्द बोलू नका…; राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला

Rahul Gandhi : अमेठीतून माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांचा पराभव झाला. त्यांचा तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर त्यांना त्यांचा दिल्लीतील बंगला सोडावा लागणार आहे. यावरून स्मृती इराणींना काही काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी ट्रोल केलं. यावरून आता राहुल गांधींनी (Rahul Gandhi) कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अपशब्द बोलू नका, अशी वॉर्निंग दिली. एखाद्या व्यक्तीचा असा अपमान करणं दुर्बलांचं लक्षण आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

“विधानसभेत उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार”; ममता बॅनर्जी मुंबईत येऊन गरजल्या

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया X वर एक पोस्ट लिहिली. त्यांनी स्मृती इराणी यांची बाजू घेत काँग्रेस कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींनी लिहिलं की, राजकारणात हार-जीत होतच असते. मी सर्वांना विनंती करतो त्यांनी स्मृती इराणी किंवा इतर कोणत्याही नेत्यांबद्दल अपशब्द बोलू नये. लोकांना तुच्छ लेखन किंवा त्यांचा अपमान करणं हे शक्तीचेच नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

नेपाळमध्ये कहर; मुसळधार पावसामुळे त्रिशूली नदीत दोन बस वाहून गेल्या, 65 जण बेपत्ता 

नेटकरी काय म्हणाले ?
राहुल गांधींच्या पोस्टवर युजर्स आणि त्यांच्या समर्थकांनी कमेंट केल्या. एका यूजरने लिहिले की, ठीक आहे सर, पण हे लोक तुमच्या आणि आमच्याबद्दल जास्त भयानक गोष्टी बोलत होते. तरीही तुम्ही बोललात हे बरं झालं. तर आणखी एका यूजरने लिहिले की, राहुल गांधीजी बरोबर बोलले. स्त्रीबद्दल बोलताना शब्द जपून वापरावे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अमेठीच्या जागेवरून स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दीक युद्ध पाहायला मिळाले. राहुल गांधीनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी घाबरून दुसऱ्या मतदारंसघात गेले, असा टोला त्यांनी लगावला. मात्र, आता राहुल गांधींनीच स्मृती इराणींची बाजू घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube