Consumer Affairs Ministry : ग्राहकांना दिलासा, दुकानदारांना चाप! मोबाईल नंबरवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
Consumer Affairs Ministry : ग्राहकांना दिलासा, दुकानदारांना चाप! मोबाईल नंबरवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Consumer Affairs Ministry : आपल्यापैकी अनेकजण काही ना काही वस्तू खरेदी करण्यासाठी विविध दुकानांमध्ये जात असतो. येथे बिल देताना ग्राहकांना संबंधित दुकानदाराकडून मोबाईल नंबर विचारला जातो. मात्र, येथून पुढे दुकानदारांना ग्राहकांचा मोबाईल नंबर देण्याचा आग्रह न धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विनाकारण येणारे प्रमोश्नल मेसेज आणि फोनपासून ग्राहकांची सुटका होणार आहे. याबाबत कंज्यूमर अफेअर्स मंत्रालय म्हणजेच ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यासंबंधी निर्देश जारी केले आहेत. कंज्यूमर अफेअर्स मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

नाना पटोले, धनंजय मुंडे, रामराजे नाईक निंबाळकर, रवींद्र धंगेकर लागले खासदारकीच्या तयारीला!

ग्राहकांच्या अनेक तक्रारींनंतर ही अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. सिंग म्हणाले की, अनेक किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांनी संपर्क क्रमांक शेअर करण्यास नकार दिल्याने सेवा देण्यास नकार दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सिंग म्हणाले. तर, दुसरीकडे मोबाईल नंबर न दिल्याने बिल तयार करण्यास अडचणी येत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

देशात ई-कॉमर्सचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. मात्र यासोबत अनेक तक्रारी, समस्याही वाढत आहेत. भारत सरकारने 1 ऑक्टोबरला ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी कन्झ्युमर अॅप लॉन्च केलं आहे. या अॅपच्या मदतीने मिळत असलेल्या तक्रारींवरुन स्पष्ट होत आहे की, ऑनलाईन शॉपिंग साईट्सच्या कंपन्यांच्या कारभारावर ग्राहक समाधानी नसल्याचे चित्र समोर आले आहे.

Nitesh Pandey Death: ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

त्यात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांचं ऑनलाईन नेटवर्क मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरत असताना, ग्राहक मात्र, ऑनलाईन शॉपिंग साईट्सच्या कंपन्यांच्या कारभारावर ग्राहक समाधानी नसल्याचे चित्र समोर आले आहे.

Video : पंतप्रधान मोदींच्या 9 योजनांनी बदललं देशाचं चित्र

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube