‘बिपोरजॉय’ चक्रीवादळासह मान्सूनही होणार दाखल, हवामान विभागाने दिली गुड न्यूज
मोका चक्रीवादळानंतर आता देशात आणखी एक चक्रीवादळ दाखल होणार आहे. बिपरजॉय हे चक्रीवादळ धडकणार आहे. पुढील 24 ते 48 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळासह पुढील ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
Sharad Pawar : शरद पवारांनी संभाजीनगर असा उल्लेख केला तरी भाजपने फेक ट्विट केलं
आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील खोल दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन हे चक्रीवादळ बनले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, रायगड, ठाणे, पालघरमध्ये जोराचा वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लखनौ कोर्टात आणखी एका गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या, वकिलाच्या वेशात हल्लेखोर
उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्यांकडून कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून या चक्रीवादळाला बिपजॉय हे नाव बांग्लादेशकडून देण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
पुढील 24 तासांत हे चक्रीवाद धडकणार असल्याची शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील २४ तासांत ते पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर जवळजवळ उत्तरेकडे आणि चक्री वादळात बदलण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, बिपरजॉय हे चक्रीवादळ उत्तर हिंद महासागर चक्रीवादळ हंगामातील दुसरे वादळ आहे. पहिले चक्रीवादळ मोचा हे होते. हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरावर तयार झाले असून मे महिन्याच्या सुरुवातीला म्यानमार आणि बांगलादेशच्या काही भागांवर धडकले आहे.