DIG विजय कुमार यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं, कारण अस्पष्ट…

DIG विजय कुमार यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं, कारण अस्पष्ट…

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधून धक्कादायक बातमी आलीआहे. कोईम्बतूरचे DIG विजय कुमार यांनी शुक्रवारी सकाळी स्वत:च्या सर्विस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय.

डीआयजी विजय कुमार सकाळच्या सुमारास 6 : 45 वाजता मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यांनी आपल्या सुरक्षा अधिकाऱ्याला आपली रिव्हॉल्व्हर देण्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी 6 : 50 च्या सुमारास कॅम्प ऑफिसच्या बाहेर येत स्वत:वर गोळी झाडली.

मोठी अपडेट : पालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाहीच, आयोगाने दिले स्पष्टीकरण

गोळी झाडल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. विजय कुमार यांच्या आत्महत्येची माहिती समजताच त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कोईम्बतूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. विजय कुमार यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप अस्पष्टताच आहे. मागील काही दिवसांपासून विजय कुमार तणावात असल्याचं त्यांनी सहकाऱ्यांना सांगितलं होतं.

दिलीपराव सत्तेसाठी हपापलेले नाहीत, वळसे पाटलांच्या बचावासाठी जुना मित्र आला धावून

6 जानेवारी 2023 रोजी विजय कुमार यांनी कोईम्बतूरचे डीआयजी म्हणून पदभार स्विकारला होता. याआधी ते बतौरला डीसीपी होते. विजय कुमार यांनी चेन्नई, कांचीपुरम, कड्डलोर, नागापट्टीनम, तिरुवरुरमध्ये पोलिस अधीक्षकाची जबाबदारी सांभाळली होती.

या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला आहे. विजयकुमार यांनी तामिळनाडू पोलीस दलात चांगली सेवा बजावली होती. त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि पोलीस दल यांच्याप्रती माझ्या संवेदना असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube