Gitanjali Aiyer : दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर काळाच्या पडद्याआड

Gitanjali Aiyer : दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर काळाच्या पडद्याआड

Gitanjali Aiyer Passed Away: आता पत्रकारिता विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी न्यूज अँकर गीतांजली अय्यर ( Gitanjali Aiyer) यांचे बुधवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 72 वर्षांच्या होत्या. गीतांजली अय्यर यांचा आजवरच्या अनेक नामवंत वृत्त निवेदकांमध्ये समावेश होता. त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर (Doordarshan) अँकरिंग केले. 1971 मध्ये ते दूरदर्शनशी जोडल्या गेल्या. त्यांनी त्यांच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार पटकावला. (Doordarshan’s popular news anchor Gitanjali Aiyer passed away.)

गीतांजली अय्यर यांनी इंग्रजीमध्ये पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर त्यांनी आपलं पुढील शिक्षण कोलकाता येथील लोरेटो कॉलेजमध्ये घेतले. अभिनयाची आवड असलल्याने त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमाही केला पूर्ण केला होता. त्यानंतर त्यांनी 1971 मध्ये दुरदर्शनवर नोकरी करण्यास सुरूवात केली. सलग तीन दशकं त्यांनी आपल्या अमोघवाणीने वृत्तनिवेदन केले. दरम्यान, आज त्यांचे निधन झाले असून अनेकांना त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

Jitendra Awhad ‘….तर एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटावा तसा महाराष्ट्र पेटेल’; आव्हाडांनी व्यक्त केली चिंता

केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री यांनीही अय्यर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी ‘दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवरील पहिल्या आणि सर्वोत्कृष्ट इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक असलेल्या गीतांजली अय्यर यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. त्यांनी पत्रकारिता आणि टेलिव्हिजनच्या क्षेत्रात अमिट छाप सोडत प्रत्येक बातमीत विश्वासार्हता, व्यावसायिकता जपली. मी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना त्यांच्या निधनाचे दुःखसहन करण्याची शक्ती देवो, असं ट्विट ठाकूर यांनी केलं.

दूरदर्शनमध्ये न्यूज अँकर म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर, गीतांजली यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि मार्केटिंगच्या जगात प्रवेश केला. त्या उद्योग संघटना CII च्या सल्लागारही होत्या. गीतांजली यांचा आवाज सुरेख होताच, पण त्याचं रुपंही देखणं होतं. त्या पत्रकारितेता विश्वातील स्टार अॅंकर होत्या. अनेकांनी त्यांना अभिनय करण्याचेही सल्ले होती. याच आग्रहाखातर त्यांनी ‘खानदान’ या मालिकेतही काम केले होते.

त्या काळात त्या एक लोकप्रिय चेहरा होत्या. न्यूज अँकरिंगसोबतच त्या जाहिरात क्षेत्रातही सक्रिय दिसत होत्या. गीतांजली यांनी त्या काळातील अनेक ब्रँडसाठी काम केले. गीतांजली यांच्या निधनाने पत्रकारितेच्या विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा आवाज लोक नेहमी लक्षात ठेवतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube