‘आप’चे खासदार संजय सिंह यांना अटक, दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना दारू घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तब्बल 10 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता खासदार सिंह यांच्या रुपाने याच प्रकरणात ही दुसरी अटक आहे. सिंग यांना अटकने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (ED arrests AAP MP Sanjay Singh in Delhi excise policy case )
ED arrests Rajya Sabha MP Sanjay Singh in Delhi excise policy case: Officials
— Press Trust of India (@PTI_News) October 4, 2023
काय आहे ईडीचा आरोप?
ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये दिल्लीतील व्यापारी दिनेश अरोरा यांचा उल्लेख केला आहे, दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात आरोपी म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण याच अरोरा यांनी माफीचा साक्षीसार होण्याचे मान्य केले आहे. संजय सिंह यांच्या उपस्थितीत अरोरा यांच्यासोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठक घेतल्याचा ईडीचा आरोप आहे.
एका कार्यक्रमादरम्यान संजय सिंह यांची भेट झाल्याचे अरोरा यांनी सांगितले. संजय सिंह यांची भेट घेतल्यानंतर ते दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याही संपर्कात आले. दिल्ली निवडणुकीपूर्वी निधी गोळा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असा दावा ईडीने केला आहे. त्यानंतर आज संजय सिंह यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र चौकशीदरम्यान असहकार्य केल्याचे सांगत ईडीने सिंह यांना अटक केली आहे.
Asian Games 2023 : भालाफेकमध्ये भारताने रचला इतिहास; नीरज पुन्हा ‘गोल्डन बॉय’
अरविंद केजरीवाल यांचा निशाणा
‘आप’ने संजय सिंह यांच्यावरील कारवाईला राजकीय स्वरुप असल्याचे म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि पोलिस यासारख्या सर्व यंत्रणा आणखी सक्रिय होतील. काल पत्रकारांच्या घरावर आणि आज संजय सिंह यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. असे अनेक छापे टाकले जातील, पण घाबरण्याचे कारण नाही.
Nobel Prize 2023 : रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ञांना मिळाला पुरस्कार
आप नेते राघव चढ्ढा म्हणाले की, गेल्या 15 महिन्यांपासून भाजप तथाकथित दारू घोटाळ्याच्या नावाखाली आमच्यावर आरोप करत आहे. गेल्या 15 महिन्यांत ईडीने 1 हजार ठिकाणी छापे टाकले आहेत. अनेक अधिकारी यात गुंतले आहेत. पण आता 15 महिने उलटून गेल्यानंतर आणि लोकांना अटक करूनही आजपर्यंत तपासात एकाही तपास यंत्रणेला एक पैसाही सापडलेला नाही. यावरून ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादीच्या 6 अन् भाजपच्या 5 आमदारांवर शिंदेंचा ‘वाघ’ भारी; भुजबळांना ‘वेट अॅन्ड वॉच’चा सल्ला
ईडीच्या कारवाईबाबत इतर विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ईडी हे भाजपचे निवडणूक विभाग बनले आहे. संजय सिंह हे निर्भय व्यक्ती असून ते मोदी सरकारला अडचणीत आणतात. आता त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, असेही ते म्हणाले.