7 वर्षांनंतर भारतात येणारी इराणी तेलाची पहिली खेप हुकली; ‘पिंग शुन’ टँकर अचानक चीनकडे वळल्याने ऊर्जा सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह

या जहाजाने वेदीवर पोर्ट येथे पोहोचण्याचे संकेत दिले होते. मात्र, अचानक मार्ग बदलत हे टँकर आता डोन्गयिंग च्या दिशेने सरकत आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 26

First shipment of Iranian oil missed : इराणमधून cत येत असलेल्या कच्च्या तेलाच्या टँकरने अचानक दिशा बदलत चीनकडे कूच केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हे जहाज भारतात पोहोचाल असतं, तर गेल्या सात वर्षांनंतर इराणकडून भारत येणारी ही पहिलीच तेलाची खेप ठरली असती. मात्र अचानक बदललेल्या मार्गामुळे हे टँकर आता नेमकं कुठे पोहोचणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

पिंग शून नावाचं अफ्रामॅक्स टँकर 2022 मध्ये तयार करण्यात आलं असून अमेरिकेने 2025 मध्ये यावर निर्बंध लादले होते. शिप ट्रेकिंग फर्म केप्लरच्या माहितीनुसार, आठवड्याच्या सुरूवातीला या जहाजाने वेदीवर पोर्ट येथे पोहोचण्याचे संकेत दिले होते. मात्र, अचानक मार्ग बदलत हे टँकर आता डोन्गयिंग च्या दिशेने सरकत आहेत. या जहाजाने मार्चच्या सुरूवातीला खार्ग आयलंड येथून कच्च तेल लोड केलं होतं.

दरम्यान, पश्चिम आशियातील तणावामुळे भारतासमोर ऊर्जा सुरक्षेचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. इराणकडून स्ट्रेट हॉफ होर्मूझवर नाकाबंदी करण्यात आल्याने जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होत आहे. जरी अमेरिकेने समुद्रात असलेल्या इराणी जहाजांसाठी तात्पुरती सवलत दिली असली, तरी भारतीय सरकारी कंपन्या अजून देखील सावध भूमिका घेत आहेत.

खरात-चाकणकर कॉल कनेक्शन उघड? 33,727 सेकंदांच्या संभाषणाचा दावा, CDR समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

या टँकरने भारताऐवजी चीनकडे वाळण्यामागे अनेक कारणं समोर आली आहेत. अमेरिकन निर्बंधांमुळे डॉलरमधील व्यवहारांवर मर्यादा आल्या असून मध्यस्थ बँक इराणी संस्थांशी व्यवहार टाळत आहेत. त्याचबरोबर विमा, कागदपत्रं आणि शिपिंग प्रक्रिया देखील अधिक गुंतागुंतीची झाली आहे. बभरताने मे 2019 पासून इराणकडून तेल खरेदी थांबवली असल्याने अनलोडींग प्रक्रियेत अडचणी येत आहेत. नुकतंच सी बर्ड नावाचं जाहज इराणी एलपीजीसह मंगलोर पोर्ट येथे पोहोचलं, मात्र पेमेंट समस्यांमुळे ते अद्याप अनलोड होऊ शकलेलं नाही.

दुसरीकडे, चीन मात्र या परिस्थितीचा फायदा घेताना दिसत आहे. इराणी तेलाचा प्रमुख खरीददार म्हणून चीनकडे स्वतंत्र पेमेंट आणि वितरण व्यवस्था असल्याने पिंग शून सारखी जहाज आता भारताऐवजी चीनकडे वळत आहेत. त्यामुळे जागतिक ऊर्जा राजकारणात पुन्हा एकदा चीनची भूमिका अधिक मजबूत होत असल्याचं स्पष्ट होत आहे.

follow us