हेमा मालिनी ते पवन सिंग पर्यंत… पहिल्या यादीत कोणत्या सेलिब्रिटींना तिकीट मिळाले?

हेमा मालिनी ते पवन सिंग पर्यंत… पहिल्या यादीत कोणत्या सेलिब्रिटींना तिकीट मिळाले?

BJP Candidates List 2024: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 साठी (Loksabha Election 2024) 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाराणसीतून, गृहमंत्री अमित शहा यांना गांधीनगरमधून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनऊमधून उमेदवारी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून तिकीट देण्यात आले आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत 5 सेलिब्रिटी उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे. त्यापैकी 4 उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली असून, एका जागेसाठी नव्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

5 सेलिब्रिटी उमेदवारांना भाजपच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले
हेमा मालिनी- मथुरा
रवि किशन- गोरखपूर
दिनेश लाल यादव- आझमगड
मनोज तिवारी- ईशान्य दिल्ली
पवन सिंग- आसनसोल

भाजपची पहिली यादी जाहीर; दिग्गजांना घरी बसवले, नवीन चेहऱ्यांवर डाव

या पाच सेलिब्रिटी उमेदवारांपैकी 4 उमेदवार भोजपुरी चित्रपटसृष्टीतील आहेत. यामध्ये रवी किशन, पवन सिंह, मनोज तिवारी, दिनेश लाल यादव यांच्या नावाचा समावेश आहे. हेमा मालिनी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे.

पहिल्या यादीत कोणत्या राज्याच्या किती जागा?
भाजपने पहिल्या यादीत 195 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापैकी 51 उत्तर प्रदेशातील, 26 पश्चिम बंगाल, 24 मध्य प्रदेश, 15 गुजरात, 15 राजस्थान, 12 केरळ, 9 तेलंगण, 14 पैकी 11 आसाममधील आहेत. यामध्ये झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 5, जम्मू-काश्मीरमधील 2, उत्तराखंडमधील 3, अरुणाचल प्रदेश 2, गोव्यातील 1, त्रिपुरा 1, अंदमान-निकोबारमधील 1 आणि दमण दीवमधील 1 जागांचा समावेश आहे.

Lok Sabha Election : भाजपचे 195 उमेदवार जाहीर : मोदी-शहा लोकसभेच्या रिंगणात

तिकीट कोणाला कुठून मिळाले?
वाराणसी- नरेंद्र मोदी
करीमगंज- कृपानाथ मल्ला
कोरबा – सरोज पांडे
रायपूर – ब्रिजमोहन अग्रवाल
दिल्ली- प्रवीण खंडेलवाल
ईशान्य दिल्ली- मनोज तिवारी
पश्चिम दिल्ली- कंवलजीत सेहरावत
दक्षिण दिल्ली -रामवीर सिंग बिधुरी
नवी दिल्ली- बन्सुरी स्वराज
राजकोट – पुरुषोत्तम रुपाला
गांधी नगर- अमित शहा
अमेठी – स्मृती इराणी
लखनऊ- राजनाथ सिंह
मुझफ्फरनगर – संजीव बालियान
संभल – परमेश्वर लाल सैनी
गोतंबुद्दनगर- महेश शर्मा
मथुरा- हेमा मालिनी
हरदोई- जय प्रकाश रावत
सीतापूर – राजेश वर्मा
बंदा- आरके सिंग पटेल
फतेपूर – साध्वी निरंजन ज्योती
उन्नाव- साक्षी महाराज
श्रावस्ती- साकेत मिश्रा
गोरखपूर – रविकिशन
हमीरपूर – पुष्पेंद्रसिंह चंदेल
आझमगड – दिनेश लाल यादव (निरहुआ)
जौनपूर – कृपा शंकर सिंह
फैजाबाद- लल्लू सिंग
कुशीनगर – विजयकुमार दुबे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube