धक्कादायक! साधं पाणी पिलं अन् 118 कर्मचारी थेट दवाखान्यात; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Gujarat News : गुजरातमधील सूरत शहरातून एक धक्कादायक बातमी (Gujarat News) समोर आली आहे. येथील एका डायमंड कंपनीच्या वॉटर कुलरमध्ये कुणीतरी विषारी पदार्थ मिसळला. यामुळे कंपनीतील 118 कर्मचारी आजारी पडले. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता कर्मचारी धोक्यातून बाहेर आले आहेत. आता सर्वच कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्याच्या उद्देशाने कुणीतरी पिण्याच्या पाण्यात विषारी पदार्थ मिसळला होता. यामुळे कर्मचाऱ्यांची तब्बेत बिघडली. डिसीपी आलोक कुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की कपोदरा भागात मिलेनियम कॉम्प्लेक्स स्थित अनभ जेम्सच्या कर्मचाऱ्यांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. कोणत्याही कर्मचाऱ्यावर विषारी पदार्थाचे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून या कर्मचाऱ्यांना सध्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
शेवगावचा बिग बुल साई कवडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात! गुजरातमधून आवळल्या मुसक्या
कीटकनाशकाने भरलेली एक प्लास्टिकची पिशवी होती. यामुळे पाण्यात काही प्रमाणात विषारी पदार्थ मिळाले असतील. हेच पाणी कर्मचाऱ्यांच्या पोटात गेले. फॉरेन्सिक टीम तपासणी करत आहे तसेच येथील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत. सर्व पथकांकडून तपास केला जात आहे. पाण्याच्या टाकीजवळ असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपी कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.