शेवगावचा बिग बुल साई कवडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात! गुजरातमधून आवळल्या मुसक्या

शेवगावचा बिग बुल साई कवडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात! गुजरातमधून आवळल्या मुसक्या

Share Market Broker Sai Kavade Arrested who fraud of Investors moneny : शेअर मार्केटमध्ये (Stock Market) पैसे गुंतवून गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याच्या आमिषाने गंडा घालण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) तालुक्यात सुरू होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता अखेर यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेवगावचा बिग बुल म्हटले जाणारा साईनाथ कल्याण कवडे याच्या गुजरातमधून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

सर्वात मोठं डिजिटल अरेस्ट स्कॅम! 86 वर्षीय महिलेची 20 कोटींची फसवणूक, मुंबईत भयंकर घडलं

नेमकी घटना अशी की, अनेक गुंतवणुकदारांपैकी एक असलेले अवधुत विनायक केदार, रा.खंडोबानगर, शेवगाव, ता.शेवगाव यांना साईनाथ कल्याण कवडे, रा.कुरूडगाव ता.शेवगाव याने त्याचे ऍ़सिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास सांगुन गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर दरमहा 12% परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यावर केदार व त्याचे कुटुंबियांतील सदस्यांनी तसेच परिसरातील इतर 5 लोकांनी वेळोवेळी ऍ़सिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीमध्ये 1,61,42,900/-रूपये गुंतविले होते. आरोपीने गुंतवणुकीच्या रक्कमेचा परतावा न देता तसेच गुंतवणुक केलेली रक्कम न देता आर्थिक फसवणुक करून पळून गेला. याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बस स्थानक, एसटी बस आणि प्रीपेड ऑटो रिक्षेबाबत मंत्री सरनाईकांकडून महत्त्वाचे निर्देश

याबाबत पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्थिक फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यांचे समांतर तपास करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संतोष लोढे, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ,फुरकान शेख, प्रशांत राठोड व ज्योती शिंदे अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा येरवडातील मुक्काम वाढला; जामिनावर 20 मार्चला सुनावणी होणार

दरम्यान हा आरोपी गुन्हा दाखल होण्यापुर्वीच फरार झालेला होता. तसेच तो सातत्याने त्याचे राहण्याचे ठिकाण व मोबाईल बदलत असल्याने तपासामध्ये अडचण येत होती. मात्र सोमवारी 17 मार्चला पोलिसांना हा आरोपी हा सुरत, गुजरात राज्यात असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी तपास पथकाने सुरत, गुजरात येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपणच साईनाथ कवडे असल्याचं कबूल केलं.

तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचेकडे त्याच्या मालकीची महिंद्रा कंपनीची कार किशोर शिवाजी जाधव, रा.तिसगाव, ता.पाथर्डी यास दिल्याची माहिती सांगीतली. त्यानंतर पोलिसांनी ही 15,00,000/- रू किंमतीची महिंद्रा कार जप्त केली आहे. तर आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube