Manipur Violence :मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार, अचानक झालेल्या गोळीबारात 9 ठार, अनेक जण जखमी, 11 जिल्ह्यात कर्फ्यू

Manipur Violence :मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार, अचानक झालेल्या गोळीबारात 9 ठार, अनेक जण जखमी, 11 जिल्ह्यात कर्फ्यू

Manipur Violence : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur Violence) घटना घटत आहेत. मेतेई समाजाला (Meitei community) अनुसूचित जमातीचे आरक्षण (reservation) लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात एक महिन्यापूर्वी मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात शेकडो लोकांनी आपला जीव जीव गमवावा लागला होतो. अशातच काल रात्री पुन्हा एकदा मणिपूरच्या काही भागात हिंसाचार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खामेनलोक भागात झालेल्या ताज्या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या हिंसाचारात अनेक जण जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. (Incident of violence in Manipur, 9 dead, 10 injured)

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हिंसाचारात होरपळलेल्या मणिपूरमधये आज पुन्हा एकदा हिंचाराच उफाळून आला. उग्रवादी लोकांनी केलेल्या अचानक गोळीबारात 9 जण ठार झाले तर 10 जण जखमी झाले. काल एका उग्रवादी गटाने खामेनलोक गावातील अनेक घरांना आग लावून जाळपोळ केली. शिवाय, मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. त्यात अनेक जण जखमी झाले.

मृत 9 जणांमध्ये एका महिलेचाही समावेश
इंफाळ पूर्वेचे पोलिस आयुक्त शिवकांत सिंह यांनी सांगितले की, खामेनलोक भागात उसळलेल्या ताज्या हिंसाचारात नऊ जण ठार आणि 10 जखमी झाले. मृत्यू झालेल्या नऊ लोकांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या अनेकांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि गोळ्यांच्या जखमा आढळून आल्यात. सध्या शवविच्छेदनाची कारवाई सुरू आहे. तर जखमींना उपचारासाठी इंफाळमध्ये हलवण्यात आलं असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, हिंसाचारग्रस्त भागात आसाम रायफल्स तैनात करण्यात आल्या असून परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे ते म्हणाले.

‘एकनाथ शिंदे राक्षसी महत्वाकांक्षा असलेले मुख्यमंत्री’; जाहिरातवादावर आव्हाडांचा घणाघात

हिंसाचाराची कारणे काय?

मेतेई समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीसाठी 3 मे रोजी ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच पहाडी भागात संघर्ष झाला होता. त्यानंतर अनेकदा हिंसाचाराची घटना घडल्याचं समोर आलं. आरक्षणावरून ह्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आरक्षणावरून मेतेई आणि कुकी समाजात संघर्ष झाला पेटला असून या संघर्षाने आता हिंसाचाराचे स्वरुप आहे.

दरम्यान, खामेनलोक परिसरात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते. सध्या मणिपूरच्या 16 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू आहे, तर संपूर्ण ईशान्येकडील राज्यात इंटरनेट सेवा बंद आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube