Ind Pak Tension : जम्मू-जोधपूर ते भुज-राजकोट… आठ प्रमुख शहरांची एअर इंडियाची उड्डाणे रद्द, वाचा महत्त्वाचे अपडेट्स

Ind Pak Tension : जम्मू-जोधपूर ते भुज-राजकोट… आठ प्रमुख शहरांची एअर इंडियाची उड्डाणे रद्द, वाचा महत्त्वाचे अपडेट्स

India Pakistan Tensions Air India Indigo Cancel Flights : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या कालावधीनंतर युद्धबंदी जाहीर (India Pakistan Tensions) करण्यात आली. सध्या सीमेवर शांतता आहे पण पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नाहीये. संभाव्य धोके लक्षात घेता, भारत अजूनही सतर्क स्थितीत आहे. कंपन्यांनी सीमावर्ती भागातून जाणाऱ्या विमानांसाठी एक नवीन अॅडवायजरी जारी (Air India Indigo) केली आहे.

अलिकडच्या घडामोडींमुळे सुरक्षेच्या कारणास्तव, एअर इंडियाने (Air India) 13 मे रोजी आठ प्रमुख शहरांना जाणारी आणि येणारी उड्डाणे रद्द करण्याची सूचना जारी केली आहे. यामध्ये जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या शहरांचा समावेश आहे. काल संध्याकाळी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे एअरलाइनने ही घोषणा केली. सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

अलीकडील घडामोडी लक्षात घेता आणि सुरक्षिततेचा विचार करता, मंगळवार 13 मे रोजी जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तुम्हाला अपडेट देत राहू, असं एअरलाइनने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.

Daily Horoscope : नोकरीत प्रमोशन, विवाहयोग जुळून आलेत; आज ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार

एअर इंडियाने या घटनांचा तपशील उघड केलेला नसला तरी, खबरदारीच्या उपाययोजनांमुळे संभाव्य सुरक्षा समस्यांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. या शहरांमध्ये आणि येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा आणि रीबुकिंग किंवा रिफंडसाठी एअरलाइनच्या सपोर्ट चॅनेलशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. एअर इंडिया व्यतिरिक्त इंडिगो एअरलाइन्सने मंगळवार 13 मे रोजी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोट येथे जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे.

26/11 च्या वेळी केलेली मागणी आता भारताची अधिकृत भूमिका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोशल मीडियावर शेअर केलेल्या निवेदनात एअरलाइनने म्हटलंय की, अलीकडील घटना लक्षात घेता आणि सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. 13 मे रोजी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोट येथे जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे तुमच्या प्रवासाच्या योजनांवर कसा परिणाम होऊ शकतो, हे आम्हाला समजते. आम्हाला त्या गैरसोयीबद्दल मनापासून वाईट वाटते.

आमचे पथक परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत आणि वेळोवेळी अपडेट्स देतील. विमानतळावर जाण्यापूर्वी कृपया आमच्या वेबसाइट किंवा अॅपवर तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासा. कोणत्याही मदतीसाठी, आम्ही फक्त एका कॉल किंवा मेसेजच्या अंतरावर आहोत आणि मदत करण्यास नेहमीच तयार आहोत. इंडिगोने पूर्वी बंद असलेल्या मार्गांवर सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच हे अपडेट आले. दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळ नागरी उड्डाणांसाठी पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे हे विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले होते, जे सुरुवातीला 15 मे पर्यंत वाढवण्यात आले होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube