जागतिक शाळांसाठी भारत बेस्ट, देशात 972 शाळांची नोंदणी; लवकरच चीनला पछाडणार..

जागतिक शाळांसाठी भारत बेस्ट, देशात 972 शाळांची नोंदणी; लवकरच चीनला पछाडणार..

International School in India : भारतात आजमितीस शिक्षण मिळण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध आहे. राज्य सरकारांची (Indian Education) शिक्षण मंडळे किंवा शाळांमधून शिक्षण प्राप्त करता येते तसेच सीबीएसई माध्यमातूनही (CBSE Pattern) शिक्षण घेता येते. पण आता आणखी एक चलन वेगाने विस्तारत आहे. भारतात इंटरनॅशनल स्कूल मोठ्या (International School) संख्येने सुरू होत आहेत. ग्लोबल एज्युकेशन बोर्ड मान्यताप्राप्त अशा शाळांची संख्या मागील पाच वर्षांत 10 टक्क्यांनी वाढली आहे. आता भारतातील या शाळांची (Indian Education) संख्या 972 पर्यंत पोहोचली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येतही 36 टक्के वाढ झाली आहे.

सध्याच्या परिस्थितीत चीनमध्ये (China) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शाळा आहेत. चीनमध्ये अशा शाळांची संख्या 1124 इतकी आहे. पण भारतात वेग वाढला असून अशीच परिस्थिती राहिली तर भारतात याबाबतीत लवकरच चीनला मागे टाकू शकतो. भारतात सध्या शिक्षणाला जास्त महत्व दिले जात आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांत मुलांना कोणत्या शाळेत शिक्षण द्यावे असा प्रश्न कायम असतो. आर्थिक स्थिती पाहून पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा किंवा सीबीएसई बोर्डाच्या शाळांत टाकतात. आता पालकांचा ओढा या इंटरनॅशनल स्कूलकडे देखील वाढला आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू; शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

या दशकाच्या सुरुवातीला देशभरात फक्त 8 संस्था इंटरनॅशनल बोर्डाच्या माध्यमातून शिक्षण देत होते. पण 2011 – 12 येता येता केंब्रिज इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल बेक्कालॉरीएटच्या शाळांची संख्या अनुक्रमे 197 आणि 99 पर्यंत पोहोचली.

आयएससी रिसर्च संस्था इंटरनॅशनल स्कूल मार्केटशी संबंधित माहितीवर नजर ठेवत असते. या संस्थेने सांगितले की सन 2019 मध्ये देशात या शाळांची संख्या 884 होती. आता 2025 मध्ये शाळा वाढून त्यांची संख्या 972 झाली आहे. मागील पाच वर्षांच्या काळात शाळांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये एकट्या महाराष्ट्रात 210 शाळा आहेत. या शाळांत आयबी किंवा आयजीसीएसई प्रोग्राम अंतर्गत शिक्षण उपलब्ध करून देत आहेत. यानंतर कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांचा नंबर आहे. कर्नाटकात 160, तमिळनाडूत 153 आणि तेलंगणात 92 तसेच उत्तर प्रदेशात अशा शाळांची संख्या 68 आहे.

भारतात फक्त मोठ्या शहरांतच नाही तर लहान शहरांत सुद्धा इंटरनॅशनल स्कूल सुरू होत आहेत. महाराष्ट्रातील अगदी लहान शहरापासून मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यातील सोनाघाटी गावातही शाळा सुरू होत आहे. जर याच वेगाने इंटरनॅशनल स्कूल सुरू होत राहिले तर लवकरच भारत चीनच्या पुढे गेलेला असेल.

शाळांची उन्हाळी सुट्टी कमी होणार; राज्यात एकाचवेळी परीक्षा, काय परिणाम होणार ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube