Underwater Metro Train : देशात आता पाण्यातूनही धावणार मेट्रो, उद्या होणार टेस्टिंग

Underwater Metro Train : देशात आता पाण्यातूनही धावणार मेट्रो, उद्या होणार टेस्टिंग

Indias First Underwater Metro : देशात सध्या मेट्रोचं जाळ निर्माण करण्याचं काम झपाट्याने सुरू झालं आहे. तर तर नुकतचं पंतप्रधान मोदी यांनी अनेक ठिकाणी मेट्रोचं उद्धाटनही केले आहे. मात्र आता यावरही आणखी अश्चर्य म्हणजे आपल्या देशात आता पुल, जमीन, आणि भुयारी मार्गानंतर आता थेट पाण्यातूनही मेट्रो रेल्वे धावणार आहे. ही भारतातील पहिली पाण्यातून धावणारी मेट्रो रेल्वे असणार आहे. तर उद्या 9 एप्रिलला या मेट्रोची चाचणी होणार आहे.

ही मेट्रो हुगळी नदीमध्ये बनवण्यात आलेल्या टनेलमधून धावणार आहे. यामध्ये 6 कोच जोडलेले असणार आहेत. त्याचबरोबर या मेट्रोची आणखी अनेक खासियत आहे. सध्या टेस्टिंगसाठी कोलकाता ईस्ट-वेस्ट मेट्रो प्रोजेक्ट अंतर्गत या दोन 6 कोच असेलेल्या गाड्या तयार करण्यात आल्या आहेत.

सॉल्ट लेकमध्ये हावडा मैदान आणि सेक्टर व्हीला जोडणाऱ्या ईस्ट-वेस्ट मेट्रो कॅरिडोर सेक्टर व्ही स्टेशन आणि सियालदह दरम्यानचं अंतर कमी करण्यासाठी या या दोन 6 कोच असेलेल्या गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. एस्प्लेनेड आणि हावडा मैदानादरम्यान 4.8 किलोमीटरच्या अंतरात ही चाचणी घेण्यात येणार आहे.

BJP Mission South : दक्षिणेत भाजपच्या ‘कमळा’समोरची आव्हाने अन् राजकीय समीकरणं

सियालदह स्टेशनपर्यंत या गाड्या सामान्या गाड्यांप्रमाणे चालतील तर सियालदह ते एस्प्लेनेडपर्यंत त्यांना बॅटरीवरील सुरूंगांद्वारे ढकललं जाणार आहे. तर पुन्हा या गाड्या एस्प्लेनेड ते हावडापर्यंत या गाड्या सामान्या गाड्यांप्रमाणे चालतील.

ही भारतातील पहिली पाण्यातून धावणारी मेट्रो रेल्वे असणार आहे. तर डिसेंबर 2023 पर्यंत होण्याची शक्यता आहे. लंडन आणि पॅरिस जोडणाऱ्या पाण्यातून धावणाऱ्या मेट्रो रेल्वेशी याची तुलना करण्यात येत आहे . यासाठी बोगदा तयार करण्यासाठी प्रति किलोमीटर 120 कोटी रुपये खर्च आल्याचं सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube