Internship: सरकार कॉर्पोरेट अग्निवीर तयार करत असल्याचा विरोधकांचा आरोप; अर्थमंत्र्यांचं थेट उत्तर

Internship: सरकार कॉर्पोरेट अग्निवीर तयार करत असल्याचा विरोधकांचा आरोप; अर्थमंत्र्यांचं थेट उत्तर

Finance Minister Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की सरकार 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार आहे. यावर विरोधकांनी आक्रमक होत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर सविस्तर बोलून काँग्रेसवर जोरदार टीका केली.

भाजपला राम-राम करत माजी आमदार रमेश कुथेंचा जय महाराष्ट्र; पाच वर्षांनी पुन्हा बांधल शिवबंधन

विरोधकांचा दावा आहे की, पीएम इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणं म्हणजे प्रत्येक कंपनीत 4 हजार तरुणांना इंटर्नशिप द्यावी लागेल. प्रत्येक कंपनीला चार हजार तरुणांना इंटर्न म्हणून नेम  णं कसं शक्य होणार? तसंच ते नोकऱ्या देत नसून केवळ इंटर्नशिप देत असल्याची टीका विरोधक करत आहेत. तसंच, सरकार कॉर्पोरेट अग्निवीर तयार करत आहे असा आरोप विरोधक करत आहेत.

अर्थमंत्र्यांचा दावा अर्थसंकल्पात तरुणांसाठी 2 लाख कोटींची तरतूद, अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांची घोषणा

अर्थमंत्री म्हणाल्या की, देशातील टॉप 500 कंपन्यांचे देशातील मोठ्या शहरांमध्ये अनेक प्लांट आहेत. आम्ही इंडस्ट्रीसोबत बसून प्रत्येक योजना आखली आहे. त्यानंतरच आम्ही ही घोषणा केली आहे. टॉप 500 कंपन्यांची उलाढाल प्रचंड आहे आणि त्यांची अनेक कार्यालये आहेत.

कंपन्यांमध्ये इंटर्न करणाऱ्या तरुणांना दरमहा पाच हजार रुपये देऊ. कंपन्यांनी फक्त तरुणांना संधी द्यावी आणि त्यांना शिकवावं. तरुणांना संधी मिळाल्यावर 12 महिन्यांनंतर त्यांना टॉप 500 पैकी एका कंपनीत काम शिकल्याचं प्रमाणपत्र मिळेल. यानंतर त्यांना नोकरी मिळण्यात मोठा फायदा होईल. यामध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये भत्ता, तर 6000 रुपये अतिरिक्त भत्ताही दिला जाणार आहे.

‘नोकऱ्या आहेत पण तरुण तयार नाहीत’

त्याचबरोबर उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगते की, काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी इन्फ्रा कंपनी L&T चे प्रमुख म्हणाले की, त्यांच्याकडे 45 हजार नोकऱ्या आहेत, पण त्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांसाठी योग्य तरुण सापडत नाहीत. अशा कौशल्यांसाठी आम्ही तरुणांना तयार करत आहोत. इंटर्नशिपनंतर या तरुणांना अनेक कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणानुसार कोणती कंपनी योग्य आहे याची माहिती त्यांच्याकडे असेल असंही त्या म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube