IRS अधिकारी राहुल नवीन यांची ईडीच्या संचालकपदी नियुक्ती, दोन वर्षासाठी सांभाळणार कार्यभार

IRS अधिकारी राहुल नवीन यांची ईडीच्या संचालकपदी नियुक्ती, दोन वर्षासाठी सांभाळणार कार्यभार

Rahul Navin : केंद्रीय तपास एजन्सी अंमलबजावणी संचालनालयाला (Directorate of Enforcement) नवे संचालक मिळाले आहेत. केंद्र सरकारने बुधवारी (14 ऑगस्ट) 1993 च्या बॅचचे IRSअधिकारी राहुल नवीन (Rahul Navin) (57) यांची अंमलबजावणी संचालनालयाचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती केली. ते संजय कुमार मिश्रा यांची जागा घेतील.

Vinesh Phogat : विनेश फोगटला धक्का, पदक मिळणार नाही, CAS ने याचिका फेटाळली 

केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी राहुल नवीन ईडीच्या कार्यकारी संचालक पदावर होते.

बिहारचा रहिवाशी असलेले राहुल नवीन यांनी ईडीमध्येच अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. सध्या ते ईडीच्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. परंतु आता त्यांची ईडी संचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित अनेक प्रकरणांच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी अर्थमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. आता ते पुढील 2 वर्षांसाठी ईडीचे पूर्णवेळ संचालकपद सांभाळतील. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने जारी केलेल्या आदेशानुसार, राहुल यांचा कार्यकाळ 2 वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत असेल.

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5 हजार रुपये द्या, सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

ईडीचे माजी संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राहुल नवीन यांची गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राहुल नवीन यांच्या कार्यकाळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

राहुल नवीन हे मूळचे बेतिया जिल्ह्याचे रहिवासी आहेत. ते 1993 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते एजन्सीमध्ये त्यांच्या उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्डसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांना बढती देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube