निकाल येताच जनसुराजचे उमेदवार चंद्रशेखर सिंहांचं निधन; ह्रदय विकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Chandrashekhar Singh passes away जन सुराजच्या तरारी विधानसभा मतदारसंघातील उमेदरवार चंद्रशेखर सिंह झटक्यानंतर उपचारादरम्यान निधन झालं.

Chandrashekhar Singh Passes Away

Jansuraj candidate Chandrashekhar Singh passes away as soon as results are out during treatment after suffering a heart attack : बिहार विधानसभा निवडणुकीत भारतातील यशस्वी राजकीय रणनितीकार अशी त्यांची ओळख असलेले प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. मात्र हा निकाल हाती येताच त्यांच्या पक्षाच्या भोजपूर जिल्ह्यातील तरारी विधानसभा मतदारसंघातील उमेदरवार चंद्रशेखर सिंह यांचं ह्रदय विकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान निधन झालं.

निकाल येताच जनसुराजचे उमेदवार चंद्रशेखर सिंहांचं निधन…

जन सुराज पक्षाच्या भोजपूर जिल्ह्यातील तरारी विधानसभा मतदारसंघातील उमेदरवार चंद्रशेखर सिंह 31 ऑक्टोबरला यांना पहिला ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तात्काळ पटना येथील मोठ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शु्क्रवारी दुपारी त्यांची तब्बेत बिघडली. सायंकाळी 4 वाजता त्यांना दुसरा ह्रदय विकाराचा झटका आला. सातत्याने प्रयत्न करून देखील सायंकाली सात वाजता मात्र त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंढवा जमीन प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित काँग्रेस नेते वडेट्टीवारांची मागणी

चंद्रशेखर सिंह हे भोजपूर जिल्ह्यातील तरारीतील कुरमूरी गावाचे मुळचे राहिवासी होते. ते शिक्षक संघाचे माजी सक्रिय पदाधिकारी होते. तसेट त्यांनी ब्रह्मर्षि समाजाच्या प्रदेश अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांची सामाजित प्रतिष्ठा आणि पकड मजबूत होती. मात्र निवडणुकी दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती. तर निकालामध्ये त्यांना 2271 मतं मिळाली होती. हा पराभवाचा निकाल येताच त्यांचा मृत्यू झाला आहे.

follow us