Karnataka Election : फुलासोबत मोदींच्या दिशेने मोबाईल फेकला; पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक

  • Written By: Published:
Karnataka Election : फुलासोबत मोदींच्या दिशेने मोबाईल फेकला; पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक

Karnataka Election : कर्नाटक निवडणुकीचा प्रचार आता मोठ्या चर्चेत आहे. काल कर्नाटकातील म्हैसूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला. यादरम्यान दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली आहे. निवडणूक प्रचारासाठी खास तयार केलेल्या वाहनाकडे एका व्यक्तीकडून मोबाईल फेकण्यात आला. दुसरीकडे पोलिसांनी सांगितले की ज्या व्यक्तीने वाहनावर फोन फेकला, त्याला पकडण्यात आलं आहे, परंतु त्यामागे त्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता.

आसाम सरकार 300 मद्यधुंद पोलिसांना VRS देणार, सीएम हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोड शोदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या (BJP) महिला कार्यकर्त्याकडून उत्साहाच्या भरात फोन फेकला गेला. त्यांच्याकडून कोणत्याही द्वेषातून ही कृती घडली नाही. फोन गाडीच्या बोनेटवर पडला. पंतप्रधान मोदींच्या हे लक्षात येताच त्यांनी सोबत असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) अधिकार्‍यांचे लक्ष त्याकडे वेधले.

अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या सोबत एसपीजीच्या सुरक्षा होती. ती महिला (जिचा फोन पंतप्रधानांच्या गाडीवर पडला) भाजप कार्यकर्ता होती. एसपीजीच्या जवानांनी नंतर तिला फोन परत केला. तो उत्साहात फेकला गेला होता आणि महिलेचा कोणताही वाईट हेतू नव्हता.”

BrijBhushan Sharan Singh ; ‘पंतप्रधानांनी सांगितले तर मी तात्काळ राजीनामा देईन’

दरम्यान रोड शो दरम्यान पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने स्थानिक लोक आणि भाजप समर्थकांनी गर्दी केली होती. पीएम मोदी यांच्यासाठी खास डिझाईन केलेल्या वाहनावरून रोड शो करण्यात आला. यावेळी रस्त्यात लोकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि भाजपचे झेंडे फडकण्यात आले. कर्नाटकात १० मे रोजी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान मोदी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून त्यामध्ये ते अनेक निवडणूक रॅली आणि रोड शो घेत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube