अभिनेता विजयची मोठी घोषणा, करुर चेंगराचेंगरी प्रकरणात मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत

Karur Stampede : सुपरस्टार अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी मोठी घोषणा करत करूरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात मृतांच्या

  • Written By: Published:
Karur Stampede Photo

Karur Stampede : सुपरस्टार अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी मोठी घोषणा करत करूरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 27  सप्टेंबर रोजी तमिळनाडूमधील करुर येथे विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडून रॅली आयोजित करण्यात आली होती मात्र या रॅलीत अचानक चेंगराचेंगरी झाल्याने 39 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची विजने घोषणा केली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी देखील शनिवारी मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.

शनिवारी करुर येथे आयोजित रॅलीमध्ये 27 हजार लोक उपस्थित होते. पोलिसांकडून या रॅलीसाठी दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत वेळ देण्यात आला होते मात्र रॅलीच्या (Karur Stampede) ठिकाणी लोक सकाळी 11 पासून येत होते.  तर रॅलीच्या ठिकाणी विजय उशीरा पोहोचल्याने अनेक जण कडक उन्हात उभे होते त्यामुळे विजयच्या (Thalapathy Vijay) भाषादरम्यान अनेक लोक बेशुद्ध पडू लागने आणि रॅलीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत  आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे.

या प्रकरणात तमिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण (G. Venkataraman) यांनी सांगितले की, रॅली आणि सभेसाठी दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत परवानगी देण्यात आली होती मात्र या सभेसाठी सकाळी 11 वाजेपासून गर्दी जमू लागली. तसेच विजय (Vijay) सभेच्या ठिकाणी 7.40  ला पोहचले  पुरेसे अन्न किंवा पाण्याशिवाय तासन्तास वाट पाहत होते असं तामिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण यांनी सांगितले. तसेच आम्ही पोलिसांच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यापूर्वी टीव्हीकेच्या रॅलींमध्ये कमी गर्दी होती, परंतु यावेळी, गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती.

आयोजकांनी करूरमध्ये मोठ्या मैदानाची विनंती केली होती आणि सुमारे 10,000 लोकांची अपेक्षा होती, परंतु सुमारे 27,000 लोक जमले होते. विजय ज्या प्रचारस्थळी जनतेला संबोधित करणार होते त्या ठिकाणी 500 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते अशी देखील माहिती त्यांनी दिली.

500 पोलिस कर्मचारी तैनात

पुढे डीजीपींनी सांगितले की, मृतांमध्ये 12 पुरुष, 16 महिला आणि 10 मुले (पाच मुले आणि पाच मुली) यांचा समावेश आहे. 500 हून अधिक पोलिस अभिनेता-राजकारणी विजय ज्या ठिकाणी गर्दीला संबोधित करणार होते त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

IND vs PAK Final : दुबई स्टेडियम हाऊसफुल्ल; भारत-पाकिस्तान फायनलसाठी सर्व तिकिटे सोल्ड आउट

follow us