दरवर्षी महिलांना मिळणार १ लाख रुपये, कॉंग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा

दरवर्षी महिलांना मिळणार १ लाख रुपये, कॉंग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा

Nari Nyaya Guarantee : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) विविध पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने देत आहेत. अशातच आता काँग्रेसने (Congress) महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाटी‘नारी न्याय गॅरंटी’ (Nari Nyaya Guarantee) योजनेची घोषणा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत गरीब महिलांना दरवर्षी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिलं.

Sensex Closing Bell : 1109 अंकांनी कोसळला सेन्सेक्स; गुंतवणुकदारांचे 14 लाख कोटी बुडाले 

काँग्रेसने ही योजना गरीब महिला, आशा, अंगणवाडी सेविका, मध्यान्ह भोजन कर्मचारी आणि नोकरदार महिलांसाठी केली आहे. याशिवाय गावातील महिलांना कायद्याची जाणीव करून देण्यासाठी महिला मैत्रीची नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

‘फडणवीसांना एक चूक महागात पडणार’; मनोज जरांगेंनी कडक शब्दांत सुनावलं 

या योजनांची घोषणा करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, महिलांसाठीच्या योजना जाहीर करण्यापूर्वी आम्ही शेतकरी, मजूर आणि तरुणांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. आमची गॅरंटी म्हणजे पोकळ आश्वासनं किंवा नुसती वक्तव्ये नाहीत, हे सांगण्याची गरज नाही. आमची आश्वासने म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहगे. आमची आश्वासने पूर्ण केल्याचा ट्रॅक रेकॉर्ड आमच्याकडे आहे. 1926 पासून आम्ही प्रत्येक वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करत आहोत. आमचे विरोधक जन्मालाही आले नव्हते तेव्हा आम्ही जाहीरनामा बनवत होतो

काँग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या योजना

1. महालक्ष्मी हमी:
कॉंग्रेसने गरीब कुटुंबातील महिलांसाठी महालक्ष्मी हमी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी 1 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.

2. अर्धी लोकसंख्या – पूर्ण अधिकार :
या योजनेंतर्गत, कॉंग्रेस सत्तेत आल्यास केंद्र सरकार महिलांना सरकारी नियुक्त्यांमध्ये अर्धा वाटा देईल.

3. शक्तीचा सन्मान :
या योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात केंद्र सरकारचं योगदान दुप्पट केले जाईल.

4. अधिकार मैत्री:
या योजनेंतर्गत, महिलांना त्यांच्या अधिकारांबद्दल मदत करण्यासाठी आणि जागरुक करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक पॅरा लीगल असिस्टंट म्हणजे कायदेविषय सहाय्यक नेमला जाईल.

5. सावित्रीबाई फुले वसतिगृह: : काँग्रेसने नोकरी करणाऱ्या महिलांबाबतही मोठी घोषणा केली आहे. कॉंग्रेसने म्हटलं आहे की, सर्व जिल्हा मुख्यालयात नोकरदार महिलांसाठी किमान एक वसतिगृह स्थापन केले जाईल. देशभरात या वसतिगृहांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube