नागपूर : नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृध्दी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलंय. बहुप्रतिक्षेनंतर अखेर समृध्दी महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. हा समृध्दी महामार्ग गरिबांसाठी नसून श्रीमंतांसाठी बनवण्यात आल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. ते म्हणाले, ज्या समृध्दी महामार्गाची प्रशंसा शिंदे-फडणवीसांकडून केली जात आहे, त्याच महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. ज्या गाड्यांचा अपघात झालाय […]
मुंबई : सर्वोच्च न्यायालय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नसल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली. ही सुनावणी आता 14 फेब्रुवारीला होणार असल्याचा निर्णय न्यायालयाकडून घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निकम म्हणाले, नव्या सात सदस्यीय घटनापीठासाठी ठाकरे गटाकडून आज याचिका दाखल करण्यात […]
मुंबई : शिवसेना वकीलांमार्फत बाजू मांडत आहे, निर्णय काय येणार? हा न्यायालयाचा अधिकार असून मी यावर भाष्य करणार नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे, तसेच भविष्यामध्ये राजकीय […]
मुंबई : न्यायालयाने सत्तासंघर्षावरील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय आज दिला. सतत सुरू असलेल्या ‘तारीख पे तारीख’ यावरुन अनिल कपूरच्या मेरी जंग या चित्रपटाची आठवण झाली. सर्व परिस्थिती समोर आहे. पक्षांतर बंदीचा कायदा आहे. आयोग काय बोलतं हे समोर आहे. निदान फेब्रुवारीच्या १४ तारखेला तरी कोर्ट निर्णय देईल, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]
पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं काम चांगलं सुरु असून सगळं सुरळीत चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनाही अनुभव आहे. त्यांना माहीत आहे की, मंत्रिमंडळात कोण आहे कोण नाही. ते लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील आणि मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी पुण्यात पत्रकारांसोबत […]
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता सध्या उर्फी व भाजप नेत्या चित्र वाघ यांच्यात वाद पेटला आहे. यावर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. यातच या प्रकरणात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही […]