IPS Transfer : राज्याच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक पदावरुन विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजी नगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज […]
Devendra Fadanvis : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री […]
राज्यातल्या सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिक्षकांच्या बदल्या थांबणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या कशा थांबल्या जातील, याबाबत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय होणार असल्याचं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त केसरकर आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी […]
मला भाजपकडून कोणतीही ऑफर मिळाली नसून मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी दिलं आहे. मध्यांतरी आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या, पण देशमुख यांनी प्रवेश केला नाही. मात्र, आज नागपूरमध्ये आज आशिष देशमुख भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना […]
Sushilkumar Shinde : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव आज़ाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाम नबी आझाद हे भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. असं विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी सोलापुरात केले आहे. ‘पण ते एवढ सोप्प नसत’ अशी कोपरखळी शिंदेंनी मारताच सभागृहात हशा पिकला. अहो ते एवढं सोपं नाही; भाजपा प्रवेशावर शिंदेंचा गुलाब नबींना चिमटा#GhulamNabiAzad […]
Chhatrapati Sambhaji Nagar Court Order : नामांतराबाबत अंतिम अधिसूचना येत नाही, तोपर्यंत औरंगाबादचं (Aurangabad)नाव सरकारी दस्ताऐवजांवर बदलू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)दिले आहेत. औरंगाबादच्या नामांतरावर आज मुंबई उच्च न्यायालयात अत्यंत महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. याची पुढील सुनावणी 7 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. […]