Keshub Mahindra : महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष अन् देशातील सर्वात वद्ध अब्जाधीश केशुब महिंद्रांचे निधन

  • Written By: Published:
Keshub Mahindra : महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष अन् देशातील सर्वात वद्ध अब्जाधीश केशुब महिंद्रांचे निधन

Keshub Mahindra Demises :  महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष आणि देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश केशुब महिंद्रा (Keshub Mahindra) यांचे बुधवारी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. 1962 ते 20212 अशी 48 वर्षे ते महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष होते. सध्या त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा (Anand Mahindra) या पदावर कार्यरत आहेत. अलीकडे फोर्ब्सने 1.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह केशव महिंद्रा यांना भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश म्हणून घोषित केले होते.

महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे काका केशुब महिंद्रा यांचे आज निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरचे (INSPACE) अध्यक्ष पवन गोयंका यांनी ट्विटद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 2023 च्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. महिंद्रा समूहाचे सुमारे 48 वर्षे नेतृत्व केल्यानंतर केशब महिंद्रा यांनी 2012 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. महिंद्राची एकूण संपत्ती 1.2 अब्ज डॉलर होती.

उद्धव ठाकरेंबरोबरील बैठकीत शिजलं काय ? ; पवार म्हणाले, काही मुद्द्यांवर मतं वेगळी..

कोण होते केशुब महिंद्रा 

केशुब महिंद्रा यांनी डेथ पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर 1947 मध्ये महिंद्रा ग्रुपमध्ये सामील झाले होते. त्यानंतर 1963 मध्ये ते या ग्रुपचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा समूहाने एक नवी उंची गाठली. तब्बल 48 वर्षांच्या सेवेनंतर 2012 साली त्यांनी महिंद्राचे अध्यक्षपद त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवले होते. केशुब महिद्रांनी टाटा स्टील, सेल, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स अशा अनेक कंपन्यांमध्ये बोर्ड स्तरावर काम केले होते.

पहाटेचा शपथविधी पार्ट २ : शरद पवार म्हणतात; भविष्यात कोण काय करेल याचा भरवसा नाही

महिंद्रा समूहाला नव्या उंचीवर नेले

केशुब महिद्रांच्या 5 दशकांच्या दीर्घ कार्यकाळात केशुब महिंद्रांनी महिंद्रा समूहाची केवळ देशातच नव्हे तर जगभरात एक मोठी कंपनी म्हणून स्थापना केली. कामासाठी आणि मालवाहतुकीसाठी वाहने तयार करण्याच्या क्षेत्रात कंपनीला एक प्रमुख कंपनी बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आजच्या काळात, Mahindra & Mahindra ट्रॅक्टर, SUV केसेस तसेच हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील सेवांसाठीदेखील ओळखली जाते. 1987 मध्ये व्यवसाय जगतातील त्यांच्या योगदानाबद्दल केशुब यांना फ्रेंच सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube