CIB Score: आरबीआयकडून सिबील स्कोरबाबत मोठे बदल; काय आहेत बदल? अन् केव्हा होणार लागू?
RBI CIBIL : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सिबील स्कोरबाबतच्या नियांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांचा सिबील स्कोर प्रत्येक 15 दिवसानंतर अपडेट केला जाणार आहे. त्यामुळं ग्राहकांना त्यांचा सिबील स्कोर चांगला ठेवावा लागणार आहे. दरम्यान, हा नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू केला जाणार आहे. (RBI ) रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची माहिती दिलीय
मी जेव्हा जेव्हा संसदेत बोलते तेव्हा पतीला आयकरची नोटीस; संसदेतील भाषणांमुळे सुप्रिया सुळे टार्गेट
स्कोर अपडेट
तुम्हला या नवीन सिबील स्कोरच्या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. तुमचा जर सिबील स्कोर खराब असेल तर तुम्हाला पुढच्या वेळी कर्ज मिळवण्यासाठी बँकांमध्ये फेऱ्या माराव्या लागतील. जे लोक वेळेवर कर्जाची परतफेड करणार नाहीत, त्यांना हा फटका बसणार आहे. दर 15 दिवसानंतर ग्राहकांचा सिबील स्कोर अपडेट केला जाणार आहे. त्यामुळं वित्तीय संस्थांनी लवकरात लवकर क्रेडीट स्कोअर अपडेट करावा असं आरबीआयने म्हटलं आहे..
International Left Handers Day : डावखुरा की उजवा, कोण जास्त हुशार? जाणून घ्या, इंटरेस्टिंग फॅक्टस्..
कमी दरात कर्ज मिळू शकतो
सिबील स्कोर हा दर महिन्याच्या 15 तारखेला आणि महिन्याच्या शेवटी अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्था आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या त्यांच्या इच्छेनुसार देखील तारखा निश्चित करु शकतात. ज्या अंतर्गत डेटा अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्थांनी ग्राहकांची क्रेडिट माहिती दर महिन्याला सीआयसी यांच्याकडे सबमिट करणं आवश्यक आहे. दरम्यान, या निर्णयाचा बँक आणि ग्राहक या दोघांनांदी फायदा होणार आहे. बँक आणि एनबीएफसी या दोन्हींसाठी देखील क्रेडिट माहिती खूप महत्वाची आहे. याद्वारे ते कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला देऊ नये याबद्दल अधिक चांगला निर्णय घेऊ शकतात. चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळू शकतो.