निमंत्रण मिळाले तरीही शपथविधीला जाणार नाही, शुभेच्छाही देणार नाही; ममता बॅनर्जी कडाडल्या…

निमंत्रण मिळाले तरीही शपथविधीला जाणार नाही, शुभेच्छाही देणार नाही; ममता बॅनर्जी कडाडल्या…

Mamata Banerjee On PM Modi : देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन होत असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकूण 52 ते 55 मंत्री शपथ घेऊ शकतात. या शपथविधी सोहळ्याला अनेक राजकीय नेते हजेरी लावणार आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेस मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.

निलेश लंकेंच्या डोळ्यात दोनदा पाणी अन् विखेंचा करेक्ट कार्यक्रम; काकडेंकडून अनेक गुपिते उघडकीस 

शनिवारी नवनिर्वाचित खासदारांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शपथविधीचं निमंत्रण मिळालं का? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, आम्हाला अजून निमंत्रण मिळालेले नाही. निमंत्रित केले गेले तरीही आम्ही शपथविधीच्या समारंभाला उपस्थित राहणार नाही. कारण, हे सरकार अलोकतांत्रिक आणि असंवैधानिकपणे स्थापन केले जातेय. या सरकारला आम्ही आमच्या शुभेच्छा देऊ शकत नाही, आमच्या शुभेच्छा जनतेसोबत आहेत, असंही बॅनर्जी म्हणाल्या.

पाकिस्तानविरुद्ध काटे की टक्कर, भारतीय संघात ‘या’ स्टार खेळाडूची होणार एंट्री 

सरकार फार काळ चालणार नाही
पुढं बोलतांना त्या म्हणाल्या की, इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला नसला तरीही ते भविष्यात दावा करणार नाहीत, असं नाही. देशाला बदल हवा आहे. मोदी कोणालाच नको आहेत. खरंतर या निकालानंतर मोदींनी पायउतार व्हायला हवे होते. सत्तेत बसल्यानंतर ते त्यांच्या मित्रपक्षांना कितपत संतुष्ट करू शकतील, हा प्रश्नच आहे. एनडीएतीलच अनेक जण मोदींवर नाराज आहे, त्यामुळं हे सरकार फार काळ चालणार नाही, असा दावाही बॅनर्जींनी केली.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, संसदेचे कामकाज सुरू झाल्यावर आमचे खासदार निष्क्रिय बसणार नाहीत. एनआरसी आणि सीएए थांबवण्यासाठी ते आवाज उठवतील.

 

टीएससीने खासदार सुदीप बंदोपाध्याय यांची लोकसभेतील नेतेपदी नियुक्ती केली. डॉ. काकोली घोष दस्तीदार यांची उपनेतेपदाची निवड केली. तर कल्याण बॅनर्जी यांची लोकसभेतील मुख्य प्रतोदपदी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं बॅनर्जींनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube