INDIA आघाडीचा महत्त्वपूर्ण निर्णय, विरोधी पक्षांचे नेते पुढील आठवड्यात मणिपूरला जाणार

  • Written By: Published:
INDIA आघाडीचा महत्त्वपूर्ण निर्णय, विरोधी पक्षांचे नेते पुढील आठवड्यात मणिपूरला जाणार

Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचाराच्या दरम्यान दोन महिलांच्या विवस्त्र व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओने अनेक प्रश्न उपस्थित केले असून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) विरोधी आघाडीचे नेते पुढील आठवड्याच्या शेवटी मणिपूरला जाऊ शकतात. सकाळी संसदेत विरोधी पक्षांच्या बैठकीत तारखेबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. (Manipur Women Parade Opposition India Alliance Congress Mamata Banerjee Jdu Nitish Kumar Ncp Visit State)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मणिपूरला जाण्याचे संकेत दिले आहेत. तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख बॅनर्जी यांनी सांगितले की ते राज्याला भेट देण्यासाठी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी मणिपूरला जाण्याबाबत चर्चा केली.

भारतातील विरोधी पक्षांच्या युतीमध्ये कोणते पक्ष आहेत?

काँग्रेस, टीएमसी, आप, जेडीयू, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा द्रमुक, डावे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जेएमएम आणि आरजेडी असे 26 पक्ष आहेत.

मणिपूरमध्ये हिंसाचार कधी सुरू झाला?

3 मे रोजी मणिपूरमध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मीतेई समुदायाने आदिवासी एकता मार्च काढला, परंतु यादरम्यान राज्यात हिंसाचार उसळला. तेव्हापासून आतापर्यंत दीडशेहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. राज्यातील मेईतेई समाजाची लोकसंख्या ५३ टक्के आहे. त्याचबरोबर नागा आणि कुकी समाजाच्या आदिवासींची लोकसंख्या 40 टक्के आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube