नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला पण सात खासदार मुकले, नेमकं कारण काय?
Member Of Paliament oth Ceremony : लोकसभेच्या (Loksabha) पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अखिलेश यादव, असदुद्दीन ओवैसी, सांबित पात्रा यांच्यासह अनेक खासदारांनी संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र, सात खासदारांनी संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतलेली नाही. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांनी पंजाबचे खासदार आणि खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह यांचं नाव घेतलं मात्र, अमृपाल सिंह (Amrutpal Singh) सभागृहात उपस्थित नव्हते. यासोबतच समाजवादी पार्टीचे खासदार अफजल अंसारी सभागृहात आले पण त्यांनी शपथ घेतली नाही. इतरही पाच खासदारांनी शपथ घेतलेली नाही. या खासदारांनी कोणत्या कारणामुळे शपथ घेतलेली नाही, याबाबत जाणून घेऊयात..
बेट्या, टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार; जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा भुजबळ
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह यांनी शपथ घेतली नाही….
लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांनी अमृतपाल यांचं नाव शपथ घेण्यासाठी पुकारलं मात्र, अमृतपाल सभागृहात उपस्थित नव्हते, कारण अमृतपाल सिंह यांना राष्ट्रीय सुरक्ष कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधातील कारवाईचा कालावधी एक वर्षाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलायं. या कारणामुळे अमृतपाल सिंह तुरुंगातून बाहेर येऊ शकले नाहीत. मात्र, लोकसभेच्या नियमांनूसार त्याचं शपथविधीसाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
अफजल अन्सारी सभागृहात आले मात्र शपथ घेऊ शकले नाहीत..
समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनीही लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. ते सभागृहात पोहोचले, पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांचा शपथविधी झाला नाही. अफजल संसदेत पोहोचले आणि काही वेळ अखिलेश यादव यांच्या बसले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोकसभा सचिवालयाने त्यांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यापासून रोखले होते. शपथविधी हा देखील लोकसभेच्या कामकाजाचा एक भाग असल्याने अफजल यांना शपथ देण्यात आली नाही.
आष्टीकरांना पुन्हा का घ्यावी लागली शपथ? महाराष्ट्रातल्या खासदारांकडून घोषणा, अध्यक्षांनी दिली समज
अभियंता रशीद यांनीही शपथ घेतली नाही
अभियंता रशीद यांनी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि ते विजयीही झाले. रशीद हे टेरर फंडिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. रशीद यांनी शपथ घेण्यासाठी अंतरिम जामीन मागितला होता. मात्र त्यांना जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्यांचाही शपथविधी झाला नाही.
‘या’ खासदारांनीही शपथ घेतली नाही
शपथ न घेतलेल्या सात खासदारांपैकी 3 TMC, 1 काँग्रेस, 1 समाजवादी पक्ष आणि 2 अपक्ष खासदार आहेत. काँग्रेसचे शशी थरूर, टीम एसीचे दीपक अधिकारी, शत्रुघ्न सिन्हा आणि हाजी नूरुल इस्लाम यांनीही अद्याप शपथ घेतली नाही. अपक्ष अमृतपाल सिंग आणि अभियंता रशीद यांनाही शपथ घेता आली नाही.
दरम्यान, ज्या खासदारांनी शपथ घेतली नाही त्यांना सभागृहात मतदान करू दिले जाणार नाही किंवा त्यांना खासदार म्हणून कोणतीही सुविधा मिळणार नाही. लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होत आहे. याआधी या खासदारांनी शपथ घेतली नाही, तर हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षपदाच्या मतदानात सहभागी होऊ शकणार नाहीत.