बेट्या, टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार; जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा भुजबळ

बेट्या, टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार; जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा भुजबळ

Manoj Jarange On Chagan Bhujbal : बेट्या टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचं थेट नाव घेत इशारा दिलायं. दरम्यान, मराठा आंदोलन स्थगित झाल्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच जरांगे यांनी अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेत भुजबळांवर रोख धरला.

बांधकाम कामगारांसाठीच्या तीन योजना माहिती आहेत का? मुलीच्या लग्नासाठी 51 हजार मिळणार…

मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळ तू आमच्यात काडी लावतो आहे, पण मी लय पुढचा आहे. ओबीसी मराठा समाजात भांडणं लावू नकोत, तू जितकं लढशील तितके मराठे एक होत आहेत. तू तिकडं पाझर ठोकलं की मी खुट्टा ठोकणार आहे. तुझ्यामुळे राज्यातील मराठे एक झाले आहेत. छगन भुजबळ काहीही म्हणाला तरीही कोणाच्याही पायाला पाय लावायचा नाही, जोवर सहन होतंय तोवर सहन करा, निवडणुकीपर्यंत आपण संयम धरणार तेव्हा बघू, बेट्या, टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार, असा थेट इशाराही मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना दिलायं.

टीम इंडियाचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक

तुमचा विरोध म्हणजे दादागिरीच…
मराठ्यांना जेवढा विरोध करायचा तो करा मराठा काहीही बोलणार नाही. ओबीसी समाजाला 1967 ला आरक्षण मिळालंय. हे आरक्षण स्वातंत्र्यानंतर मिळालं असून उरलेल्या ओबीसींना 1990 ला आरक्षण मिळालं आहे. 1884 पासूनच मराठ्याचं आरक्षण आहे, तुम्ही आधी आरक्षणात आले आहेत. तुम्हा आधी आले तरीही आम्ही विरोध केला नाही. तुम्ही आरक्षणात नसूनही आरक्षण मिळालं. तुमचं तुम्हाला राहु द्या तुमच्या आरक्षणाला आम्ही हात लावत नाही हे आरक्षण आमचं आहे ते तुम्ही घेत आहात तरीही विरोध करता ही तुमची दादागिरी असल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

2004 च्या जीआरनूसार मराठा अन् कुणबी एकच…
ओबीसी आरक्षण 1967 ला लागू झालं आहे. मराठा समाजाकडे हैद्राबाद संस्थानचं निजामकालीन गॅझेट आहे. ओबीसी आरक्षणाच्या यादीत 83 व्या क्रमांकाला मराठा अन् कुणबी जातीचा उल्लेख आहे. तसेच 2004 च्या जीआरनूसार मराठा कुणबी एकच आहे. पहिल्या दिवसापासून आमची हीच मागणी असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज