…म्हणून मोदींनी काश्मीर दौरा रद्द केला; पहलगाम हल्ल्याबाबत खरगेंचा धक्कादायक दावा

…म्हणून मोदींनी काश्मीर दौरा रद्द केला; पहलगाम हल्ल्याबाबत खरगेंचा धक्कादायक दावा

Modi cancelled his Kashmir visit Kharge’s shocking claim about the Pahalgam attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात आता केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील अनेक राज्यांना सुरक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांचा काश्मीर दौरा अन् पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक दावा केला आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी झारखंडची राजधानी रांचीममध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान मोदी यांना जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा इंटेल रिपोर्ट मिळाला होता. त्यामुळेच त्यांनी त्यांचा नियोजित काश्मीर दौरा रद्द केला. हल्ल्याच्या 3 दिवस आधीच ही माहिती मिळाली होती. ही बातमी मी एका वृत्तपत्रात वाचली आहे.

आयपीएल सामना अन् ‘एलिट’ जागांवरून IPS – IT अधिकाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये वाद

22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटक मारले गेले. त्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी हे मान्य देखील केलं होतं की, अशा प्रकारची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे या हल्ल्यातील मृत्यूंना सरकार जबाबदार नाही का? तसेच कॉंग्रेस पाकिस्तानविरोधातील कोणत्याही कारवाईसाठी सरकारसोबत आहे. देश सर्वोच्च आहे. पक्ष, धर्म जातिच्याही वर आहे.

Video : पालिका निवडणुकांचे निर्देश निघताच फडणवीस लागले कामाला; सांगितला युतीचा फॉर्मुला

त्यामुळे सरकारला जर अशी माहिती होती तर त्यांनी अधिकची सुरक्षा का तैनात का केली नाही? जर त्यांनी त्यांनी माहिती होती. हे मान्य केलं आहे.त्यामुळेच मोदींनी दौरा रद्द केला आहे. कारण भाजप केवळ जुमलावर विश्वास ठेवतं. तसेच देशाच्या संरक्षणापेक्षा त्यांचं देशातील संस्था बंद करण्यावर जास्त भर आहे. तसेच एससी, एसटी आणि ओबीसींच्या नोकऱ्या हिसकावल्या जात आहेत. त्यानंतर खरगेंच्या या आरोपांवर भाजपकडून देखील पलटवार करण्यात आला आहे. भापजचे झारखंडचे प्रमुख बाबूलाल मरांडी यांनी म्हटलं की, खरगे यांनी हे विधान अशा महत्त्वाच्या वेळी केलं आहे. ज्यावेळी भारत आणि पाकिस्तानचं लढाई निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube