जागा अन् वेळ तुम्ही निवडा; चौकशीसाठी CM सोरेन यांना ईडीचा शेवटचा अल्टिमेटम

  • Written By: Published:
जागा अन् वेळ तुम्ही निवडा; चौकशीसाठी CM सोरेन यांना ईडीचा शेवटचा अल्टिमेटम

ED Notice To Hemant Soren : जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये ईडीने सोरेन यांना दोन दिवसात चौकशीसाठी त्यांच्या आवडीनुसार जागा आणि वेळ सांगण्यास सांगत शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. या दोन दिवसात काही उत्तर न आल्यास थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

धक्कादायक : बीड जिल्ह्यात गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार; सर्वाधिक शस्त्रक्रिया खासगी रूग्णालयात

काय म्हटलं आहे ईडीने?

जमीन घोटाळ्याप्रकरणात आतापर्यंत सोरेन यांना सह नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यापैकी एकाही नोटीसला सोरेन यांनी उत्तर दिले नव्हते. तसेच चौकशीसाठीदेखील उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर आता पुन्हा ईडीने (ED) त्यांना सातवी नोटीस पाठवली आहे. यात ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये म्हटले आहे की, जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे म्हणणे नोंदवणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

आवडीननुसार वेळ आणि ठिकाण सांगावे

जमीन घोटाळाप्रकरणात सोरेन यांची चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र, आतापर्यंत सोरेन एकदाही चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नाही. त्यामुळे नव्याने पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये ईडीने सोरेन यांना दोन दिवसांचा अवधी दिला आहे. यात त्यांनी चौकशीसाठी त्यांच्या इच्छेनुसार वेळ आणि ठिकाण निवडण्याची मुभा दिली आहे. तसेच पाठवण्यात आलेले हे समन्स समजावे असेही स्पष्ट केले आहे.

आता 10 महिने बारामतीतच मुक्काम ठोकणार! सुप्रियाताईंनी घेतला दादांचा अन् भाजपचा धसका?

सहा समन्सकडे दुर्लक्ष

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना यापूर्वी जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने सहा समन्सकडे बजावले आहेत. मात्र, या सर्वांकडे सोरेन यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर आता शुक्रवारी (दि. 29 डिसेंबर) सोरेन यांना सातवे समन्स पाठवण्यात आले असून, आता सोरेन यावर उत्तर देतात की थेट चौकशीला हजर होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्यावर करण्यात येत असलेली कारवाई मुद्दाम केली जात असल्याचे म्हणत ईडी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप सोरेन यांनी केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube