MP Election 2023 : मध्य प्रदेशात राडा! मतदानाआधीच भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी

MP Election 2023 : मध्य प्रदेशात राडा! मतदानाआधीच भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी

MP Election 2023 : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी (MP Election 2023) आज मतदान होत आहे. मात्र त्याआधीच येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. इंदूरच्या राऊ विधानसभेत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानाआधीच जोरदार राडा झाल्याने नागरिकांतही भीतीचे वातावरण आहे.

MP Elections : भापपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्यांचा समावेश

मतदानाआधी दोन्ही पक्षांचे सदस्य मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात व्यस्त होते. त्यानंतर तेजाजी नगरजवळील जीतनगरमध्ये भाजपाचे नगरसेवक पुष्पेंद्र चौहान आणि काँग्रेस उमेदवार जितू पटवारी यांच्या भावाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही गटात जोरदार वाद सुरू झाले. पुढे या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यानंतर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथेही वादावादी सुरुच होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

वादाचं कारण काय ?

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त डिसीपी अभिनय विश्वकर्मा पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. भाजपाचे काही कार्यकर्ते परिसरात काही वस्तूंचे वाटप करत असल्याचा आरोप नाना पटवारी यांनी केला. तर काँग्रेसचे कार्यकर्ते जीतनगर भागात साहित्याचे वाटप करत होते असा आरोप भाजपाने केला. त्यामुळे हा वाद निर्माण झाला.

MP Loksabha Election : पक्की घरं, स्वस्त सिलेंडर अन् खात्यांत जमा होणार पैसे; मध्यप्रदेशच्या जनतेला भाजपची आश्वासनं

सत्ताधारी भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये 1 कोटी 30 लाख महिलांना आर्थिक मदत तसेच पक्कं घरं देखील दिलं जाणार आहे. ग्रामीन महिलांसाठी विशेष प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाचं काम सुरू करण्यात येणार आहे. भाजपचा हा जाहीरनामा त्यांच्या एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलं आहे. ज्यामध्ये 20 अश्वासन देण्यात आले आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून हा जाहीरनामा जाहिर करण्यात आला आहे. ज्याच नावं ‘मध्यप्रदेश संकल्प पत्र 2023’ असं आहे. यावेळी नड्डा म्हणाले की, दिवसेंदिवसं निवडणुकांमध्ये जाहिरनाम्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. कारण राजकीय पक्ष पहिले मतदारांना आकर्षित करतात नंतर त्यांना फसवलं जातं. मात्र भाजपने दिलेली अश्वासनं पाळले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube