Narendra Modi : “किचड उनके पास था, मेरे पास..” ; शायरीमधून मोदींचं विरोधकांना प्रत्युत्तर
नवी दिल्ली : लोकसभेमधील भाषणामध्ये काँग्रेसच्या (Congress) घोटाळ्यांचा उल्लेख करत काल तुफान शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या पंतप्रधान मोदींना (PM Modi) आज राज्यसभेत (Rajya Sabha) राष्ट्रपतींच्या अभिषाणावरील (Address of the President) धन्यवाद प्रस्तावावर बोलतांना विरोधकांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. विरोधकांच्या मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणांमध्येच मोदींनी सभागृहाला संबोधित केलं. विरोधकांच्या घोषणाबाजीला उत्तर देताना एवढ्या महत्त्वाच्या सभागृहातील काही लोकांची भाषा केवळ सभागृहाचीच नव्हे तर देशाची निराशा करणारी आहे, हे दुर्दैवी असल्याची टीका मोदींनी केली. विरोधकांच्या या गदारोळावर मोदींनी विरोधकांची खिल्ली उडवली. “कीचड़ उसके पास था, मेरे पास गुलाल, जो भी जिसके पास था, उसने दिया उछाल,” असं शायरीमधून मोदींनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
सभागृहात गोंधळ सुरू असतानाच मोदी भाषण करत राहिले. मोदी म्हणाले की, “काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे तक्रार करत होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार माझ्या भागात येतात. मात्र माझं त्यांना उत्तर आहे की, कर्नाटकात 1 कोटी 70 लाख जनधन खाती उघडली आहेत. त्यांच्या भागामध्ये 8 लाखांहून अधिक खाती उघडली गेली आहेत.”
मोदी म्हणाले, सर्वांना बँकेत प्रवेश मिळेल असे सांगत बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र निम्मी जनता बँकांच्या दारापर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र आम्ही आम्ही जनधन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ३२ कोटी नागरिकांचे बँक खाते उघडण्यास मदत केली. आमच्या कामांमुळे आमची ओळख निर्माण झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. तसेचं विरोधक जेवढा चिखलफेक करतील तेवढंच कमळ जास्त फुलेल असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
Turkey-Syria Earthquake : मृतांचा आकडा १६ हजारापेक्षा जास्त, काय आहे सध्याची परिस्थिती?
“महिला सर्वांगीण विकासासाठी आमच्या सरकारने खूप काही केले आहे. शौचालये बांधल्याने त्यांचा विकास होईल का, असा प्रश्न आमच्या एका सदस्याने विचारला. कदाचित एवढ्यावरच त्याचं लक्ष गेलं असेल होतं. मला अभिमान आहे की, 11 कोटी शौचालये बांधून आम्ही आमच्या माता-भगिनींना सन्मान दिला आहे,” असेही मोदी म्हणाले.
दरम्यान, ज्या योजनांना यापूर्वी काही महिने लागायचे ते प्रकल्प आता काही आठवड्यातच मार्गी लावले जात आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय, अशी माहितीही मोदी यांनी यावेळी दिली.