Download App

सर्वाधिक पंतप्रधान अन् दिल्लीच्या सत्तेतही वजन; मोठ्या राज्याची इलेक्शन ‘हिस्ट्री’ही खास…

देशातील आतापर्यंतच्या १५ पंतप्रधानांपैकी बहुतांश पंतप्रधान उत्तर प्रदेशाशी संबंधित होते. देशाच्या लोकसंख्येत उत्तर प्रदेशचा वाटा १७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत पाच टप्प्यातील मतदान झालं आहे. आणखी दोन टप्पे (Lok Sabha Election 2024) बाकी आहेत. २५ मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सगळीकडे निवडणुकीची चर्चा सुरू आहे. याच चर्चेत देशाच्या पंतप्रधानांचा इतिहास माहिती करून घेणेही महत्वाचे आहे. पंतप्रधानाचा मुद्दा आलाय आणि उत्तर प्रदेशचं नाव नाही असं होणार नाही. कारण हे तेच राज्य आहे ज्या राज्याने सर्वाधिक प्रधानमंत्री देशाला दिले आहेत. देशातील आतापर्यंतच्या १५ पंतप्रधानांपैकी बहुतांश पंतप्रधान उत्तर प्रदेशाशी संबंधित होते. देशाच्या लोकसंख्येत उत्तर प्रदेशचा वाटा १७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

देशातील १५ पैकी ६ प्रधानमंत्री उत्तर प्रदेशात जन्मले होते. तर ९ पंतप्रधान असे आहेत जे राज्यातील विविध मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत आले आहेत. याव्यतिरिक्त पंजाबमधील तीन नेते देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे दुसरे मोठे राज्य आहे. पण या राज्याने आतापर्यंत एकच पंतप्रधान दिला आहे. ते आहेत राजीव गांधी. गुजरातने दोन पंतप्रधान दिले आहेत. राजीव गांधी त्यावेळच्या अविभाजित मुंबई राज्यात जन्मले होते.

जय-पराजयाचं अंतर 10 हजारांच्या आत; ‘या’ मतदारसंघांत INDIA-NDA ची वाढणार ‘धाकधूक’

पंतप्रधानांचा कार्यकाळ पहिला तर ७५ टक्के कार्यकाळ अशाच पंतप्रधानांचा होता जे उत्तर प्रदेशातील विविध मतदारसंघातून निवडून येत होते. पंडित जवाहरलाल नेहरू १७ वर्ष पंतप्रधान राहिले. पंडित नेहरू उत्तर प्रदेशातील फुलपूर मतदारसंघातून निवडून येत होते. यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ १५ वर्षांचा होता. इंदिरा गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडून येत होत्या. आताच्या निवडणुकीत त्यांचे नातू काँग्रेस नेते राहुल गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा राहिला. वाजपेयी उत्तर प्रदेशातील लखनऊ मतदारसंघातून निवडून येत होते. तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून पंतप्रधान आहेत. मोदी गुजरातमधून येतात. पण, ते उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आताही त्यांनी तिसऱ्यांदा या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पवनची पावर डाऊन! भोजपुरी स्टार पवन सिंह यांची भाजपमधून हकालपट्टी; अपक्ष लढलं भोवलं

पीव्ही नरसिंह राव यांचं अपवाद वगळता प्रत्येक काँग्रेस नेत्याने त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात लोकसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. नरसिंह राव आंध्र प्रदेशचे होते. दीर्घकाळ पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंह यांनी राजस्थान आणि आसामचे प्रतिनिधित्व केले आहे. नेहरू गांधी परिवाराचं उत्तर प्रदेशाशी खास नातं आहे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा जन्म इलाहाबाद (आताचे प्रयागराज) मध्ये झाला होता.

जो जिंकेल यूपी, त्याची केंद्रात सत्ता पक्की

उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. राज्यात लोकसभेचे ८० मतदारसंघ आहेत. लोकसभेत राज्याच्या खासदारांची हिस्सेदारी २० टक्के आहे. त्यामुळे राज्यात कोणता पक्ष जिंकला यावर केंद्रातील सत्तेचं गणित अवलंबून राहतं. स्वातंत्र्यानंतर तब्बल तीन दशके युपी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. आता राज्यातील मतदारांचा पॅटर्न बदलला आहे. १९७७ मध्ये काँग्रेसचा पहिल्यांदा पराभव झाला होता. २०१४ मध्ये भाजपने राज्यात रेकॉर्ड ७१ जागांवर विजय मिळवला होता. १९८४ नंतरची ही पहिली निवडणूक अशी होती ज्यामुळे पूर्ण बहुमत मिळाले होते.

follow us

वेब स्टोरीज