धक्कादायक! 70 टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय ‘डीपफेक’च्या जाळ्यात?, मतदारही गोंधळात

धक्कादायक! 70 टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय ‘डीपफेक’च्या जाळ्यात?, मतदारही गोंधळात

Deepfake Video : तंत्रज्ञान जितक्या वेगाने प्रगती करत आहे तसे त्याचे काही धोकेही वेळोवेळी समोर आले आहेत. अशातलाच एक मोठा धोका म्हणजे डीपफेक. या अतिशय धोकादायक प्रकाराने लाखो भारतीयांना आपल्या जाळ्यात ओढलंय. मंत्री, राजकारणी अभिनेत्यांचा याचा फटका बसला आहे. आता याच डीपफेकबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. थोडेथोडके नाही तर तब्बल 75 टक्के भारतीयांनी डीपफेकच्या सामग्रीचा सामना केला आहे. तर 22 टक्के लोकांनी राजकीय उमेदवारांचे डिजीटल परिवर्तित व्हिडिओ, इमेजेस आणि रेकॉर्डिंग पाहिले आहे. कॉम्प्यूटर सुरक्षा कंपनी ‘मॅकएफी’च्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

आता असे मानले जात आहे की भारतातील टी 20 लीग क्रिकेट स्पर्धांमुळे डीपफेकच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असू शकते. याचं मुख्य कारण म्हणजे खरं काय आणि खोटं काय याचे आकलन करण्यात भारतीय कमी पडतात. यामुळे दैनंदिन आयुष्यात त्यातल्या त्यात इंटरनेटच्या जगतात भ्रामक गोष्टींचा सुळसुळाट झाला आहे.

Deepfake Video : ‘डीपफेक’ रडारवर! सोशल मीडियासाठी नव्या गाइडलाइन्स जारी

नागरिकांच्या दैनंदिन जीवनात एआयचा प्रभाव आणि डीपफेक कशा पद्धतीने वाढत आहे याची माहिती घेण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला एक संशोधन करण्यात आले होते. या सर्वेक्षणा दरम्यान असे लक्षात आले की चारपैकी एका भारतीयाने असे व्हिडिओ पाहिले आहेत जे नंतर बनावट असल्याचे उघड झाले.

यानंतरच्या आकडेवारीवरून असे लक्षात आले की दहापैकी आठ व्यक्ती या धोकादायक प्रकारामुळे जास्त काळजीत पडले आहेत. अर्ध्यापेक्षा अधिक लोकांचे असे म्हणणे आहे की एआय (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) मुळे ऑनलाइन घोटाळे शोधून काढणे खूप कठीण झाले आहे. या गोष्टींचा मोठा फटका आर्थिक आणि अन्य क्षेत्रांना बसू लागला आहे. यात समाधानकारक बाब म्हणजे तीस टक्के लोकांनी असा दावा केला आहे की जर एखाद्याने एआयसह निर्मित व्हॉईस रेकॉर्डिंग मेल किंवा व्हॉईस नोट शेअर करत असेल तर खरं आणि बनावट काय आहे याचा शोध घेतला जाऊ शकतो.

Priyanka Chopra Deepfake: आलिया, दीपिका नंतर आता प्रियंका चोप्रा डीप फेकच्या जाळ्यात!

18 टक्के लोक डीपफेकच्या घोटाळ्यात अडकले

मॅकएफीनुसार मागील 12 महिन्यात 75 टक्के लोकांचे असे म्हणणे होते की त्यांनी असे डीपफेक व्हिडिओ आणि अन्य कंटेट पाहिला आहे. म्हणजेच ते या जाळ्यात ओढले गेले आहेत. तर 38 टक्के लोकांनी डीपफेकच्या घोटाळ्याचा प्रत्यक्षात सामना केला आहे. तर 18 टक्के लोक या डीपफेक घोटाळ्यात अडकल्याचे म्हटले आहे.

31 टक्के लोकांना आर्थिक भुर्दंड

ज्या लोकांनी या फसवणुकीचा सामना केला आहे त्यातील 57 टक्के लोकांचे असे म्हणणे आहे की त्यांना असे काही सेलिब्रिटी मंडळींचे व्हिडिओ आणि इमेजेस मिळाले ज्यांना त्यांनी खरं मानलं. तर 31 टक्के लोकांनी यात पैसेही गमावले. यामध्ये असेही आढळून आले की 40 टक्के लोकांचे आवाज क्लोन केले गेले आणि याचा वापर त्यांचे मित्र आणि नातेवाईकांना फसवण्यासाठी करण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube