PM Modi Speech : 2024 साठी पुन्हा आशिर्वाद द्या! मोदींनी टायमिंग साधलं

PM Modi Speech : 2024 साठी पुन्हा आशिर्वाद द्या! मोदींनी टायमिंग साधलं

PM Modi Speech : देशाचा स्वातंत्र्यदिन (Independance Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Speech) यांच्या हस्ते आज सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंत देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या लोकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. देशासाठी माझी अनेक स्वप्ने आहेत. संकल्पही केले आहेत. धोरणे स्पष्ट आहेत. पण, आपल्याला काही सत्ये स्वीकारावी लागतील. आज मी लाल किल्ल्यावरून तुमचा आशिर्वाद मागण्यासाठी आलो आहे. पुढल्या 15 ऑगस्टलाही मी पुन्हा येईन असे मोदी म्हणाले.

Independance Day : ओबीसी समाजासाठी मोदींचं मोठं गिफ्ट; ‘विश्वकर्मा’ योजना सुरू करणार

याआधी 2014 मध्ये बदल घडविण्याचे आश्वासन दिले होते. ते बदल घडवून दाखवले. देशवासियांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी तुम्हाला दिलेले वचन विश्वासात बदलून दाखवले. 2019 मधील आमच्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा संधी दिलीत. बदलामुळे आणखी एक संधी मिळाली. मी तुमची स्वप्ने पूर्ण करेन असे मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी आगामी पाच वर्षे खूप महत्वाची आहेत. पुढील 15 ऑगस्टला मी लाल किल्ल्यावरून देशाचे यश आणि विकास तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यासाठी मी पुन्हा येणार आहे. आज लाल किल्ल्यावरून मी तुमचे आशिर्वादच मागण्यासाठी आलो आहे. मी फक्त तुमच्यासाठी जगतो, मी तुमच्याचसाठी घाम गाळतो याचे कारण म्हणजे तुम्ही लोकच माझा परिवार आहात.

‘भ्रष्टाचार, परिवारवाद अन् तुष्टीकरणाविरोधात लढणारच’; मोदींनी फुंकलं रणशिंग!

भ्रष्टाचार, तुष्टीकरण अन् परिवारवादाविरोधात लढणारच

यावेळी मोदींनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. मी भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार. दुसरी गोष्ट म्हणजे परिवारवादाने देशाचे मोठे नुकसान केले. देशाला एक प्रकारे जखडून ठेवले आहे. देशातील लोकांचा हक्क हिरावला गेला. तुष्टीकरणाच्या राजकारणाने देशाच्या मुलभूत चिंतनाला, चरित्राला डाग लावला आहे. या तीन गोष्टींविरोधात लढायचे आहे. हीच मोदींची कमिटमेंट आहे. भ्रष्टाचार आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करूच शकत नाही.

भारत आता 6G साठीही तयार

टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. मागील वर्षात आपण 5G सुरू करण्यात आले होते. आता आपला देश 6G साठी देखील तयार आहे. यावर्षातील मार्च महिन्यातच 6G व्हिजन डॉक्यूमेंट लाँच करण्यात आले होते. यासोबत 6G रिसर्च अँड डेव्हलपमेंट टेस्ट बँड लाँच केलं होतं. या डॉक्युमेंट्सचा नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी फायदा होणार असल्याचे मोदी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube