पराभवाचा वचपा ! काँग्रेसला धक्का देत टीएमसीने भाजपला ‘अशी’ केली मदत

पराभवाचा वचपा ! काँग्रेसला धक्का देत टीएमसीने भाजपला ‘अशी’ केली मदत

Congress : विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीएमसीने बंगालमध्ये एकला चलो रे चा नारा देत काँग्रेसला धक्का दिल्यानंतर आता पुन्हा एकदा तशीच खेळी केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपला विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून काँग्रेसने विरोधी पक्षातील खासदारांची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला दांडी मारत तृणमूल काँग्रेसने त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत. या बैठकीकडे तृणमूल काँग्रेसने पाठ फिरवली. एक प्रकारे याद्वारे भाजपला मदतच होत असल्याचे दिसत आहे.

वाचा : Mamata Banerjee : विरोधकांना झटका, ‘त्या’ निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींनी केली मोठी घोषणा

संसदेत पक्ष स्वतः आपली भूमिका आणि रणनिती मांडणार असल्याचे पक्षाचे नेते सुदीर बंदोपाध्याय यांनी सांगितले.

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान मोदी सरकारची कोंडी करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी सक्तवसुली संचालनालयाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात जवळपास 18 विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. मात्र, यामध्ये टीएमसीचे खासदार गैरहजर होते. अदानी समूहावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती गठीत करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. यापासूनही तृणमूल काँग्रेसने स्वतःला दूर ठेवले आहे.

Congress Session : काँग्रेसमध्ये आता फक्त डिजिटल सदस्यता, महिला-युवकांना 50 टक्के आरक्षण

दरम्यान, बंगालमधल्या सागरदिघी मतदारसंघात निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. सत्तेत असतानाही पराभव झाल्याने बॅनर्जी विरोधकांच्या निशाण्यावर आल्या.  या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात युती होऊन तृणमूल काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा बॅनर्जी यांनी केली.

बॅनर्जी यांनी भाजपविरोधात देशभरात विरोधकांची ताकद उभी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता मात्र त्यांनी अशी घोषणा केल्याने काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांचे टेन्शन मात्र वाढणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube